नवी दिल्ली, 26 मे : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या
(EPFO) सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांना कल्याणकारी लाभ मिळवून देण्यासाठी ई-नॉमिनेशन करणं अनिवार्य आहे. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास भविष्य निर्वाह निधी, पेन्शन
(EPS), विमा
(EDLI) लाभांच्या प्रकरणात ऑनलाइन दावा निकाली काढण्यासाठी ई-नामांकन आवश्यक आहे.
आजच्या डिजीटल युगात ई-नॉमिनेशनची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी सदस्याला EPF कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन नॉमिनेशन करू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्य कर्मचाऱ्यांना ई-नामांकनाची सुविधा दिली आहे.
ऑनलाइन नॉमिनेशनसाठी मेंबरला प्रत्येक नॉमिनीसाठी KYC तपशील द्यावा लागतो. ई-नॉमिनेशनचा फायदा तेच सदस्या घेऊ शकतात ज्यांचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात UAN सक्रीय आहे. तसंच यासाठी मोबाइल नंबर आधारशी लिंक करणंही आवश्यक आहे. EPF Nomination पेन्शन स्कीमसाठीही वैध आहे.
काय आहे प्रोसेस -
- EPFO च्या वेबसाइटवर जा.
- इथे Services सेक्शनमध्ये For Employees वर क्लिक करा.
- आता Member UAN/ Online Service वर क्लिक करा.
- मॅनेज टॅबमध्ये E-Nomination सिलेक्ट करा.
- आता स्क्रिनवर Provide Details टॅब येईल. त्यानंतर Save वर क्लिक करा.
- Family Declaration अपडेट करण्यासाठी Yes वर क्लिक करा.
- आता Add Family Details वर क्लिक करा. तुम्ही एकाहून अधिक नॉमिनी Add करू शकता.
- कोणत्या नॉमिनीकडे किती रक्कम येईल यासाठी Nomination Details वर क्लिक करा.
- कोणाला किती हिस्सा हे डिटेल्स भरल्यानंतर Save EPF Nomination वर क्लिक करा.
- OTP जनरेट करण्यासाठी e-Sign वर क्लिक करा. आधारसह लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल.
- OTP टाकून Submit करा.
- E-Nomination EPFO सह रजिस्टर होईल. ई-नॉमिनेशन झाल्यानंतर कर्मचाऱ्याला कोणतेही डॉक्युमेंट्स पाठवण्याची गरज लागत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.