मुंबई, 16 जुलै : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. आयकर विभागाच्या मते, 31 जुलै 2022 ही आयकर रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लॉगिन किंवा पासवर्ड विसरल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकत नसाल, तर येथे तुम्ही आधार ओटीपीच्या मदतीने सहजपणे आयटीआर फाइल करू शकता. आधारच्या मदतीने तुम्ही लॉगिन पासवर्ड कसा रिसेट (Reset Password of ITR using Aadhaar) करू शकता हे आज आपण जाणून घेऊया. आयकर वेबसाइटनुसार, ई-फायलिंग पोर्टलचा वापर करून आयकर रिटर्न भरणाऱ्या सर्व करदात्यांना पासवर्ड आणि लॉगिन आवश्यक आहे. परंतु, जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल, तर तुमच्यासाठी रिसेट पर्याय उपलब्ध आहे. आयकर वेबसाइटनुसार, “विसरलेला पासवर्ड ई-फायलिंग पोर्टलवर सर्व नोंदणीकृत वापरकर्ते रिसेट करू शकतात. तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर अनेक पर्यायांद्वारे पासवर्ड रिसेट करू शकता. यामध्ये ई-फायलिंग ओटीपी आणि आधार ओटीपी, बँक खाते ईव्हीसी, डीमॅट खाते ईव्हीसी, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) आणि नेट बँकिंगसह रिसेट करू शकता. हेही वाचा: Indigo Airline प्रवाशांकडून आकारत आहे ‘क्यूट चार्ज’; काय आहे याचा अर्थ? आधार OTP सह पासवर्ड कसा रिसेट करायचा? तुम्हाला आधार OTP वापरून ITR फाइल करण्यासाठी पासवर्ड रिसेट करायचा असल्यास, अगदी सोप्या स्टेप्सद्वार ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. पण यासाठी तुमचा आधार पॅनकार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.
- सर्वप्रथम ई-फायलिंग होमपेजवर जा आणि लॉगिन करा.
- तुमचा यूजर आयडी एंटर करा आणि Continue वर क्लिक करा.
- आता Secure Access Message निवडा आणि पासवर्ड पर्याय निवडा आणि ‘फॉर्गेट पासवर्ड’वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा यूजर आयडी टाका आणि ‘प्रोसीड’ वर क्लिक करा.
- पासवर्ड पेज रिसेट करण्याचा पर्याय निवडा आणि मोबाइल नंबरवर OTP पर्याय निवडा.
- आधारसोबत रजिस्टर्ड आणि Continue वर क्लिक करा.
- पुढील पृष्ठावर, जनरेट ओटीपी पर्याय निवडा आणि सुरू ठेवावर क्लिक करा. जर तुमच्याकडे आधीपासून आधार OTP असेल, तर मोबाईल नंबरवर क्लिक करा आणि सध्याचा 6 अंकी OTP टाका.
- डिक्लेरेशन चेकबॉक्स निवडा आणि ‘Verify Your Identity’ स्क्रीनवर ‘generate Aadhaar OTP’ वर क्लिक करा.
- आधारसोबत रजिस्टर्ड असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला 6 अंकी OTP एंटर करा आणि Verify वर क्लिक करा.
- ‘नवीन पासवर्ड सेट करा आणि पासवर्ड कन्फर्म करा’ टेक्स्टबॉक्समध्ये नवीन पासवर्ड एंटर करा आणि सबमिटवर करा क्लिक करा.