मुंबई: तुम्ही जर नुकतेच नोकरीला लागला असला किंवा कॉलेजच्या निमित्ताने किंवा तुम्हाला सॅलरी व्यतिरिक्त अजून एखादं बँक खातं उघडायचं आहे. बँकेत जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही किंवा त्या वेळा जुळत नाहीत त्यामुळे तुमचं काम अडलं आहे. मग टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरबसल्या बँक खातं उघडू शकता. अनेक बँकांनी आता ही सेवा सुरू केली आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन खातं उघडू शकता. कोटक महिंद्रा बँकेनं 811 या क्रमांकावर झिरो बॅलन्स खातं उघडता येत असल्याची जाहिरात केली होती. तुम्हाला तुमच्या आवडीच्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमचं बँक खातं उघडण्याची प्रक्रिया करावी लागेल, त्यासाठी आम्ही काही स्टेप्स देत आहोत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही बँकेत तुमचं खातं सहज उघडू शकता. तुमच्या जवळच्या शाखेतून फॉर्म घेऊन या आणि तो फॉर्म संपूर्ण वाचा. तो निळ्या किंवा काळ्या रंगाच्या पेनानं खाडाखोड न करता भरा. बँक अकाउंट फॉर्ममध्ये वरच्या उजव्या बाजूला एक मोठा बॉक्स दिला जाईल, की तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइजचा फोटो चिकटवावा लागेल. त्यानंतर दिलेल्या ठिकाणी तुमची विचारलेली माहिती भरून सही करा आणि तो फॉर्म बँकेत जमा करा.
घरबसल्या WhatsApp वर मिळवा खात्याची सगळी माहिती, या बँकांनी सुरू केलीय सेवायाशिवाय तुम्ही वेगवेगळ्या बँकांचे अॅप डाऊनलोड करून किंवा त्यांच्या साईटवर जाऊन मोबाईल नंबर रजिस्टर करुन खातं सुरू करू शकता. तुमचं मोबाईल बँकिंग सुरू होईल. मात्र तुम्हाला पासबुक चेक बुक मिळवण्यासाठी बँकेचा फॉर्म भरावाच लागणार आहे. ऑनलाइन खातं उघडलं तर तुम्हाला VIDEO KYC करावा लागू शकतो. तुम्हाला ओळखपत्र, घरचा पत्ता त्यासाठी आवश्यक असलेलं ओळखपत्र, फॉर्म नंबर १६ आणि पॅनकार्ड एवढी कागदपत्र महत्त्वाची आहेत. याशिवाय तुमचा फोटो आणि सही तुम्हाला ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे. तर बँकेत जाऊन खातं सुरू करायचं असेल तर तुम्हाला फॉर्मवर फोटो चिकटवून द्यावा लागेल.
तुमचं बँक खातं कधी फ्रीज केलं जातं, हा अधिकार बँकेला असतो का?ऑनलाइन खात्यासाठी अर्ज करता तेव्हा आपल्याला काही मिनिटांतच खातं सुरू झाल्याची पावती मिळू शकते, पण बँकेला आपली माहिती क्रॉसचेक करून ते सुरू करण्यासाठी दोन ते पाच दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे खातं उघडताना कोणत्या दिवशी उघडायचं याचंही प्लॅनिंग करा नाहीतर शुक्रवारी खातं उघडलं तर शनिवार रविवार बँक बंद असल्याने नुकसान होऊ शकतं.