मुंबई : आपल्याकडील पैसे खर्च होऊ नयेत म्हणून किंवा भविष्याची तरतूद म्हणून तुम्ही जवळ असलेले पैसे बँकेत FD मध्ये ठेवता. बऱ्याचदा आपल्याला ते अडीअडचणीला मोडता येत नाहीत. प्रत्येकवेळी बँक जाऊन त्यासाठी अर्ज करून ते मोडावे लागतात मग अशावेळी तुम्ही एक युक्ती करू शकता. ज्याद्वारे तुमची ही समस्या दूर होईल. फिक्स डिपॉझिटसाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरून पैसे ठेवावे लागतात. त्यानंतर तुम्हाला त्याची पावती मिळते. सर्टिफिकेट तुम्हाला जपून ठेवायला सांगितलं जातं. हे सर्टिफिकेट तुम्हाला मर्यादा पूर्ण झाली की मोडता येतं नाहीतर आपोआप रिन्यू होत राहातं. फक्त तुम्हाला बँकेत जाऊन शिक्का मारून आणावा लागतो. आता तुम्ही जर ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने FD खातं उघडलं तर मर्यादा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे हवेत की ऑटो रिन्यू हवं हा पर्याय निवडायचा असतो. तो पर्याय तुम्ही बँकेला दिला की पुढची प्रक्रिया आपणच होते. तुम्हाला ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने काढलेले FDचे पैसे मोडताही येतात. ही रक्कम मोडली तर तुम्हाला पुढचं व्याजदर मिळत नाही. मात्र तुम्हाला गरजेला पैसे उभे राहतात. हेच तुम्ही बँकेत जाऊन पावती केली तर तुम्हाला ती ऑनलाइन मोडता येत नाही. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागतो. समोरासमोर प्रक्रिया पूर्ण करून पैसे दिले जातात.
बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी आणलीय ‘महा कॉम्बो लोन स्कीम’तुमचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेचं अॅप तुम्ही घ्या. बँकेचं अॅप मोबाईलमध्ये घेतल्यानंतर तिथे लॉगइन करा. तुमचा फोननंबर पॅन नंबर जोडा. तुमची सगळी माहिती अपडेट करून झाल्यानंतर फिक्स डिपॉझिट ऑनलाइनसाठी पर्याय मिळेल. तुम्ही त्यावर क्लीक करा. तिथे तुमच्या खात्यातील रक्कम दिसेल. तुम्हाला जेवढी रक्कम फिक्ससाठी ठेवायची ती निवडा. दुसरी पायरी म्हणजे तुम्हाला किती महिन्यांसाठी किंवा वर्षासाठी FD मध्ये पैसे ठेवायचे आहेत ते निवडा, तुम्हाला ती ऑटो रिन्यू करायची का? मुदत संपल्यानंतर ती रक्कम खात्यात यायला हवी यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा. हे झाल्यानंतर तुम्ही एफडी सेव्ह करू शकता. तुमचे पैसे FD साठी जमा होतील. जेवढे जास्त पैसे तेवढा जास्त इंटरेस्ट मिळतो. त्यामुळे जास्ती पैसे FD साठी ठेवण्याचा प्रयत्न करा.
बँक ऑफ महाराष्ट्रचे हे सिक्रेट डेबिट कार्ड माहिती आहेत का?बँकांमध्ये साधारण 5 ते 5.50 पर्यंत FD वर व्याजदर दिलं जातं. अडीअडचणीच्या काळात पटकन ते पैसे आपल्या कामी येतात. त्यामुळे असे पैसे तुमच्याकडे ठेवणं केव्हाही चांगलं. जे तुम्ही इमरजन्सीसाठी वापरू शकता.