मुंबई 30 सप्टेंबर : आपल्या जर कोणत्याही गोष्टीसाठी लोन घ्यायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते. लोन मिळवणं सोपं वाटत असलं तरी देखील बँकेचे असे काही नियम आहेत, ज्या अंतर्गत आपल्याला लोन मिळत नाही. त्यांपैकी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर. तुम्ही अनेकदा लोकांना CIBIL स्कोअरबद्दल बोलताना ऐकलं असेल. परंतू CIBIL स्कोअर काय आहे आणि तो कसं काम करतो हे तुम्हाला माहितीय? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ कर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असावा. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असल्यास, तुम्ही लवकर आणि सहज कर्ज मिळवू शकता. जर समजा कोणा एका व्यक्तीला तातडीने कर्जाची गरज आहे आणि चांगला CIBIL स्कोर नाही, तर त्यांना कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी बँका अनेकबाबींवर ग्राहकाकडे पाहतात. पण त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे CIBIL स्कोर आहे. यावरून क्रेडिटच्या व्यवहारात ग्राहक किती विश्वासार्ह आहे हे दिसून येतं. त्यामुळे, तुमचा CIBIL स्कोअरही चांगला नसेल, तर तो वाढवण्याचा प्रयत्न करा. हे वाचा : Change in Rules: ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ 5 नवीन नियम, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम आता हे वाढवायचं कसं? किंवा CIBIL स्कोर कसा वाढवला जाऊ शकतो हे समजून घेऊ. 1-EMI वेळेवर भरा जर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर करत नसाल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी, कारण यामुळे तुमचा CIBIL स्कोर खराब होईल. ईएमआय किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले तर CIBIL स्कोअर चांगला होतो. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याची थकबाकी वेळेवर भरा, अन्यथा CIBIL स्कोअर खराब होईल. थकबाकीमध्ये विलंब म्हणजे तुम्हाला व्याज देखील भरावे लागेल आणि CIBIL स्कोअरमध्ये घट होईल. हे वाचा : Online Payment: फक्त 2 दिवसांनी बदलणार ऑनलाइन पेमेंटची पद्धत, वाचा डिटेल्स 2-क्रेडिट कार्डचा वापर हुशारीने करा क्रेडिट कार्ड हे क्रेडिटचे साधन आहे डेबिटचे नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर फक्त कर्ज म्हणून करा. नेहमी लक्षात ठेवा की योग्य खर्चासाठी क्रेडिट कार्ड फायदेशीर आहेत. उधळपट्टीची सवय असेल तर क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी अजिबात चांगला नाही, कारण यामुळे तुम्ही नेहमी कर्जात राहाल आणि तुम्हाला नेहमीच त्रास होईल. तुमची बिले वेळेवर भरण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डने जेवढा खर्च करता येईल तेवढा खर्च करा. तुम्ही कार्डवर एकाच वेळी अनेक कर्जे घेतल्यास, तुमच्यावर परतफेड करण्याचा दबाव असेल. यात काही चूक झाली तर CIBIL स्कोअर खराब होईल. 3-कर्जाला ट्रॅक करत राहा कर्ज घेण्यात काही नुकसान नाही, पण कोणत्या उद्देशाने कर्ज घेतले जात आहे, याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, मिक्स लोन घेणे ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या असुरक्षित कर्जांचा समावेश आहे. परंतू यामध्ये संतुलन ठेवा. अल्प आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घ्या जेणेकरुन तुमच्या पैशावर जास्त दबाव येणार नाही. जास्त असुरक्षित कर्ज घेतल्यास त्याचा वाईट परिणाम होतो. हे टाळले पाहिजे. ४- गरजेनुसारच कर्ज घ्या कर्ज नेहमी गरजेनुसार घेतले पाहिजे. मग ती वैद्यकीय आणीबाणी असो किंवा मुलाचे शिक्षण किंवा लग्न असो. तुम्ही ही एक मोठी गरज मानू शकता, परंतु लक्झरी वस्तू खरेदी करण्यासाठी मोठे कर्ज घेणे आणि त्याची वेळेवर परतफेड न करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही वेळेवर जेवढी परतफेड करू शकता तेवढेच कर्ज घ्या. जास्त कर्ज घेतल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. 5-क्रेडिट हिस्ट्री नेहमी तपासा दर महिन्याला तुमचा क्रेडिट इतिहास तपासा. यातून पैसे कुठे खर्च होतोय, ते जर तुम्हाला कळले, तर ते वाचवता येतील. क्रेडिट हिस्ट्री तपासल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईल की अशी कोणती गोष्ट आहे का जी तुमच्या खिशावर दबाव पाडेल? ज्यामुळे ते तुम्हाला थांबवता येईल आणि यामुळे तुमचा CIBIL स्कोर देखील खराब होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.