मुंबई: नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पगारावर लोन मिळतं, व्यावसायिकांना त्यांच्या व्यावसायावर आणि ज्यांना स्टार्टपण सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी मुद्रा लोनसारख्या योजना आहेतच. पण अशा काही स्त्रिया आहेत ज्या घरीच असतात त्यांना अडीअचणीच्या काळात जर लोन घ्यायची वेळ आली तर? तर अशा महिलांना लोन मिळतं का? त्यांच्याकडे कोणते पर्याय आहेत याबाबत जाणून घेऊया. सगळ्यात आधी तर घरी असणाऱ्या म्हणजेच हाउस वाईफ असलेल्या स्त्रीला बँकेतून लोन मिळत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्याचा वापर करून महिला लोन काढू शकतात. अडअडचणीच्या काळात त्या पैसे घेऊ शकतात. सावकार किंवा लोकांकडून उधार घेण्यापेक्षा हे पर्याय केव्हाही उत्तम आहे.
‘या’ बँकेने ग्राहकांना दिलं होळीचं गिफ्ट, होम लोनवरील व्याजदरात केली घट!लग्नाच्या वेळी घातलेलं सोनं किंवा तुमच्याकडे जर सोन्याचे दागिने असतील तर तुम्ही ते गहाण ठेवून त्यावर लोन काढू शकता. त्यावर तुम्हाला बँकेतून लोन मिळू शकतं. काही छोट्या संस्था देखील यावर लोन देतात. याशिवाय महिला आपल्याकडे पैसे साठवून ते बँकेत FD करून ठेवतात. त्यांना FD वरही व्याज घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे तुम्ही ठेवलेल्या रकमेवर तुम्हाला लोन मिळू शकतं. याशिवाय तुम्ही मुलांच्या नावाने जर PPF खातं उघडलं असेल तर त्यावरही लोन घेता येऊ शकतं.
अचानक पैसे लागल्यास कसे उभे करायचे, तुमच्या पॉलिसीवर मिळणार का लोन? काय नियमकोणतीही प्रॉपर्टी नावावर असेल जे वडिलोपार्जित किंवा गिफ्ट म्हणून मिळाली आहे तर ती बँकेत तारण ठेवून महिलांना त्यावर लोन काढता येऊ शकतं. याशिवाय महिलांना अन् सिक्युअर लोन मिळू शकतं. यासाठी कुणीतरी जामीन असणं आवश्यक आहे. त्यासाठी महिलांना कमी लोन मिळतं पण ती रक्कम कमी असतं. हे पर्सनल लोन म्हणूनच गृहित धरलं जातं.