Home /News /money /

Income Tax Return 2022: घरबसल्या ITR ऑनलाइन भरण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Income Tax Return 2022: घरबसल्या ITR ऑनलाइन भरण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

करदात्यांना आयटीआर भरणे आवश्यक आहे. ते ऑफलाइन, ऑनलाइन आणि सॉफ्टवेअर अशा तीन प्रकारे भरता येते. यापैकी सर्व प्रकारचे ITR फॉर्म ऑफलाइन मोडमध्ये भरले जाऊ शकतात. तर केवळ ITR-1 आणि ITR-4 ऑनलाइन भरले जाऊ शकतात. यानंतर, तिसरा पर्याय म्हणून सॉफ्टवेअर आहे जे सर्वोत्तम म्हणता येईल. सॉफ्टवेअरसह सर्व प्रकारचे आयटीआर दाखल केले जाऊ शकतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जानेवारी : कोरोनामुळे (Coronavirus) येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन CBDT ने मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही तारीख 30 नोव्हेंबर 2021 होती, जी नंतर 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आणि नंतर ती 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, अनेकांना अद्याप आयटीआर (ITR) कसा भरावा हे माहीत नाही किंवा तुम्हीही पहिल्यांदा आयकर रिटर्न भरणार असाल आणि कसा भरायचा असेल हे माहीत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला सोप्या पायऱ्यांमध्ये आयकर रिटर्न कसा भरायचा ते सांगणार आहोत. ऑनलाइन ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून रिटर्न ऑनलाइन तयार करा आणि सबमिट करा. यात फक्त ITR-1 आणि ITR-4 ऑनलाइन मोडमध्ये दाखल केले जाऊ शकतात. ते कसे करायचे हे काही स्टेपमध्ये बघू. स्टेप 1 आयकर रिटर्न भरण्यासाठी, तुम्हाला पहिल्यांदा प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, पासवर्ड, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावे लागेल. Business Idea : चार्जिंग स्टेशन सुरु करा, कमी गुंतवणुकीत कमवा लाखो रुपये स्टेप 2 आता तुम्हाला ई-फाइलवर क्लिक करावे लागेल आणि इन्कम टॅक्स रिटर्नचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर कोणता आयटीआर फॉर्म भरायचा आहे ते निवडा आणि मूल्यांकन वर्ष देखील निवडा. मूळ रिटर्न भरताना तुम्हाला ओरिजिनल रिटर्नवर क्लिक करावे लागेल आणि रिवाइज्ड रिटर्न भरताना रिवाइज्ड रिटर्नवर क्लिक करावे लागेल. स्टेप 3 आता Prepare and Submit Online या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला अनेक माहिती विचारली जाईल, जी तुम्हाला भरावी लागेल आणि सर्व माहिती सेव करून ठेवावी लागेल. स्टेप 4 आता जेव्हा तुम्ही सर्व माहिती भराल, तेव्हा तुम्हाला ती व्हेरीफाय करावी लागेल ज्यासाठी तुम्ही आधार OTP आणि नेट बँकिंगची मदत घेऊ शकता. पडताळणी केल्यानंतर, पूर्वावलोकन आणि सबमिट वर क्लिक करा. असे केल्याने तुमचे आयकर रिटर्न यशस्वीरित्या सबमिट केला जाईल. गुंतवणुकीवर कर बचतीसह दमदार रिटर्न्स हवेत? मग हा आहे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ऑफलाइन लागू असलेला ITR फॉर्म Java किंवा Excel फॉरमॅटमध्ये डाउनलोड करा आणि तो ऑफलाइन भरा. XML तयार करा आणि ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून अपलोड करा. या मोडद्वारे सर्व प्रकारचे आयटीआर फॉर्म भरता येतात. सॉफ्टवेअर या मोडला सर्वोत्कृष्ट म्हटले जाऊ शकते. कारण यात सर्व प्रकारचे आयटीआर दाखल केले जाऊ शकतात. सॉफ्टवेअरद्वारे आयटीआर दाखल करणे सोपे आहे. कारण ते वापरकर्त्याच्या पसंती आणि त्यांच्या गरजांनुसार डिझाइन केले गेले आहे. शिवाय, ते एकच डेटा पुन्हा पुन्हा भरण्याची गरज काढून टाकते. एकदा तयार केल्यानंतर मास्टर डेटामधून आवश्यक डेटा कॅप्चर करते. सॉफ्टवेअर तुलना, सामंजस्य आणि त्रुटी सुधारण्याची सुविधा प्रदान करते. रिटर्न भरण्यापूर्वी, वापरकर्ता सॉफ्टवेअरच्या मदतीने पूर्व-भरलेला फॉर्म मिळवू शकतो आणि चूक सुधारू शकतो. हे वापरकर्त्याला कायदेशीर अडचणींपासून वाचवते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Income tax, Tax benifits

    पुढील बातम्या