मराठी बातम्या /बातम्या /मनी /2 लाख गावांपर्यंत पोहोचणार HDFC बँक, 2500 हून जास्त लोकांना मिळणार रोजगार

2 लाख गावांपर्यंत पोहोचणार HDFC बँक, 2500 हून जास्त लोकांना मिळणार रोजगार

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank in Rural Area) रविवारी अशी माहिती दिली की, ग्रामीण भागात बँक त्यांची पोहोच दुप्पट करून 2 लाख गावांपर्यंत वाढवणार आहे.

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank in Rural Area) रविवारी अशी माहिती दिली की, ग्रामीण भागात बँक त्यांची पोहोच दुप्पट करून 2 लाख गावांपर्यंत वाढवणार आहे.

एचडीएफसी बँकेने (HDFC Bank in Rural Area) रविवारी अशी माहिती दिली की, ग्रामीण भागात बँक त्यांची पोहोच दुप्पट करून 2 लाख गावांपर्यंत वाढवणार आहे.

मुंबई, 27 सप्टेंबर: सध्याच्या काळात ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वाढवण्याकडे भर दिला जात आहे. दूर्गम भागातही विविध सेवा पोहोचत आहेत. दरम्यान खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank in Rural Area) रविवारी अशी माहिती दिली की, ग्रामीण भागात बँक त्यांची पोहोच दुप्पट करून 2 लाख गावांपर्यंत वाढवणार आहे. यासाठी बँकेने पुढील सहा महिन्यांत 2,500 (Jobs in HDFC Bank) लोकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

बँकेने अशी माहिती दिली आहे की त्यांचे लक्ष्य 18-24 महिन्यात ब्रँच नेटवर्क, बिझनेस करस्पाँडेंट, सीएससी (Common Service Centres) पार्टनर, व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात त्यांची उपस्थिती दुप्पट करण्याचे आहे.

एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड (कमर्शियल आणि रूरल बँकिंग) राहुल शुक्ला यांनी अशी माहिती दिली आहे की, 'भारतातील ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठांमध्ये बँक कर्जाचा प्रसार कमी आहे. याठिकाणी भारतीय बँकिंग प्रणालीसाठी स्थायी दीर्घकालीन वाढीच्या संधी आहेत. भविष्यात बँकेचे असे स्वप्न आहे की देशातील प्रत्येक पिनकोडमध्ये त्यांच्या सेवा उपलब्ध करण्यात याव्यात.'

हे वाचा-10000 रु गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई; वाचा सविस्तर

निर्मला सीतारामन म्हणाल्या- देशाला SBI सारख्या 4-5 बँकांची आवश्यकता

दरम्यान रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman on Banking Sector) अशी प्रतिक्रिया दिली आहे की, अर्थव्यवस्था आणि उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताला 4-5 एसबीआयसारख्या आकाराच्या' बँकांची गरज आहे. आयबीएच्या 74 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, इंडस्ट्रीने तत्काळ आणि दीर्घकालीन भारतीय बँकिंग कशी असावी याचा विचार करण्याची गरज आहे. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन आपल्याला केवळ बँकांची संख्या जास्त नाही तर मोठ्या बँकांची गरज आहे.

First published:

Tags: Hdfc bank, Nirmala Sitharaman