मुंबई, 14 ऑगस्ट : नोकरी करणाऱ्यांच्या खात्यातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम पीएफसाठी कापली जाते. मात्र तुमच्या EPF खात्यात किती पैसे जमा आहेत, EPF व्याजाचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही या गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. यासाठी ईपीएफ खात्यावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. EPF पासबुकमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होते.
EPF पासबुक दाखवते की तुम्ही आणि तुमच्या कंपनीने केलेल्या योगदानामुळे एकूण किती रक्कम खात्यात जमा झाली आहे. हे ईपीएफ खाते पूर्वीच्या संस्थेतून नवीन संस्थेत ट्रान्सफर करण्यात मदत करते. ईपीएफ पासबुकमध्ये ईपीएफ खाते क्रमांक, पेन्शन योजनेचा तपशील, संस्थेचे नाव आणि आयडी, ईपीएफओ कार्यालयाचा तपशील दिलेला आहे. ईपीएफ पासबुक मिळवण्यासाठी, ईपीएफओच्या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ
नोंदणी कशी करावी?
>> https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा
>> Activate UAN वर क्लिक करा.
3. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. UAN, आधार, PAN आणि इतर तपशील भरा.
4. 'Get Authorization PIN' वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. यामध्ये, तुम्हाला भरलेल्या तपशीलांची पडताळणी करण्यास सांगितले जाईल. तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे OTP पाठवला जाईल.
5. OTP एंटर करा आणि 'Validate OTP आणि UAN सक्रिय करा' वर क्लिक करा. UAN सक्रिय केल्यावर, तुम्हाला पासवर्डसह एसएमएस मिळेल. तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी हा पासवर्ड वापरा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता.
6. EPF स्टेटमेंट डाऊनलोड करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की तुम्ही नोंदणीच्या 6 तासांनंतरच तुमचे पासबुक पाहू शकाल.
दरमाह फक्त 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन; काय आहे 'ही' सरकारी योजना?
ईपीएफ स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी काय कराल?
>> https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login.jsp वेबसाइटला भेट द्या
>> UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करा. 'लॉग-इन' वर क्लिक करा.
>> लॉग इन केल्यानंतर, तुमचे पासबुक पाहण्यासाठी मेंबर आयडी निवडा.
>> पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये आहे, जे सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते.
तुम्ही तुमच्या खात्याचा पासवर्ड विसरले असल्यास, पासवर्ड रीसेट करू शकता. यासाठी EPFO सदस्याला ई-सेवा वेबसाइटला (https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/) भेट द्यावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Pf, PF Withdrawal