मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दरमाह फक्त 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन; काय आहे 'ही' सरकारी योजना?

दरमाह फक्त 55 रुपये जमा करा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन; काय आहे 'ही' सरकारी योजना?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी, कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी लागेल. तेथे IFSC कोडसोबत आधार कार्ड, बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 14 ऑगस्ट : असंघटित क्षेत्रात करत असणाऱ्या आणि ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांना म्हातारपणी आधार मिळावा यासाठी सरकारची एक पेन्शन योजना आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये किंवा वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, ते या योजनेत सामील होऊ शकतात. 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर एखाद्याचे आधीच EPF, राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा ESIC मध्ये खाते असेल तर ते या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. दरमहा 55 रुपये भरुन खाते उघडता येते या योजनेत दरमहा 55 रुपये जमा करून खाते उघडता येते. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी रक्कम जमा करण्याची तरतूद वेगळी आहे. वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील होणार्‍यांना दरमहा 55 रुपये योगदान द्यावे लागेल. जर कोणी वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सामील झाले तर त्याला दरमहा 100 रुपये योगदान द्यावे लागेल. त्याच वेळी, वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सामील झालेल्यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल. Smartphone Security Alert: सावधान! Xiaomi स्मार्टफोन वापरत असाल तर त्वरित करा हे काम, नाहीतर बँक खातं होईल रिकामं
किती गुंतवणूक करावी लागेल?
जर कोणी या योजनेत वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाले तर त्याचे वार्षिक योगदान 660 रुपये असेल. 42 वर्षे सतत रक्कम जमा केल्यानंतर एकूण गुंतवणूक 27,720 होईल. यानंतर प्रत्येक महिन्याला आयुष्यभरासाठी 3000 रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेत खातेदार जेवढे योगदान देतात तेवढेच सरकार योगदान देते. Loan Tips: कर्जाच्या कचाट्यात सापडलाय का? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी
नोंदणी कशी कराल?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी, कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी लागेल. तेथे IFSC कोडसोबत आधार कार्ड, बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी होईल आणि खाते उघडले जाईल. या योजनेत नामनिर्देशित व्यक्तीचे नाव देखील नोंदवले जाऊ शकते. तुमचे सर्व तपशील भरल्यानंतर, मासिक योगदानाची माहिती दिली जाईल. सुरुवातीचे योगदान रोख रकमेच्या स्वरूपात द्यावे लागेल. खाते उघडल्यानंतर श्रमयोगी कार्ड दिले जाते.
First published:

Tags: Central government, Money, Pension scheme

पुढील बातम्या