मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लाइफ सर्टिफिकेटचे स्टेटस ऑनलाईन कसं चेक करायचं?

लाइफ सर्टिफिकेटचे स्टेटस ऑनलाईन कसं चेक करायचं?

तुम्ही पेन्शन योजनांचे लाभार्थी असाल, तर दरमहा पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी लाईफ सर्टिफिकेज देणं आवश्यक आहे.

तुम्ही पेन्शन योजनांचे लाभार्थी असाल, तर दरमहा पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी लाईफ सर्टिफिकेज देणं आवश्यक आहे.

तुम्ही पेन्शन योजनांचे लाभार्थी असाल, तर दरमहा पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी लाईफ सर्टिफिकेज देणं आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही अजूनही लाईन सर्टिफिकेट जमा केलं नसेल, तर आताच करुन टाका. तुम्ही ऑनलाइन जमा केलं असेल तर ते कसं ट्रॅक करू शकता हे तुम्हाला माहिती असायला हवं. तुम्ही पेन्शन योजनांचे लाभार्थी असाल, तर दरमहा पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी लाईफ सर्टिफिकेज देणं आवश्यक आहे.

तुम्ही लाइफ प्रूफ सबमिट न केल्यास पेन्शन फंडाचा लाभ घेता येणार नाही. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट किंवा लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन आणि ऑफलाईन सबमिट करता येईल. आपण बँक किंवा स्कीम पोर्टलवर जाऊन जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकता.

काय आहे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट?

पेन्शनधारकांसाठी हे डिजिटल सर्टिफिकेट असून, त्यात पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लोकांची बायोमेट्रिक आणि फिजिकल माहिती आधार कार्डनुसार आहे. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट हे आयटी अॅक्टनुसार वैध प्रमाणपत्र आहे. पेन्शनधारकांच्या हयातीचा हा पुरावा आहे, ज्याच्या आधारे दरमहा पेन्शनचा लाभ दिला जातो.

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! उरले फक्त 10 दिवस आजच करा हे काम

जीवन प्रमान मोबाइल अॅप कसे डाउनलोड करावे

जीवन प्रमानच्या वेबसाइटनुसार, जीवन प्रमाणपत्रे मोबाइलवर ऑनलाइन डाऊनलोड करता येतात.

अॅप डाऊनलोड करण्यासाठी आधी https://jeevanpramaan.gov.in जा.

आता ईमेल आयडी, कॅप्चा आणि डाउनलोड करण्यासाठी संमती प्रविष्ट करा.

यानंतर ईमेलवर ओटीपी टाका.

ओटीपी टाकल्यानंतर मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यावर क्लिक करावे लागेल.

ईमेलवरील लिंकवर क्लिक करून तुम्ही एपीके फाइल डाऊनलोड करू शकता.

Saving from Salary : पगारातून बचत करता येत नाही? 'या' फॉर्म्युल्याचा करा वापर

प्रूफ आयडी डाउनलोड केल्यानंतर या लिंकवर क्लिक करून तुम्ही डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. तुम्ही पीडीएफ व्हर्जनमध्ये सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता. याशिवाय तुम्ही इथे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची स्टेटसही चेक करू शकता. लाईफ सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा व्हीआयडी असणे आवश्यक आहे.

लाईफ सर्टिफिकेट नाकारल्यास पेन्शन देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधता येईल. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करताना चुकीची माहिती दिल्यास ती नाकारली जाऊ शकते आणि तुम्हाला योग्य माहितीसह पुन्हा डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट करण्यास सांगितलं जाऊ शकतं. याशिवाय तुम्ही व्हिडीओ कॉलद्वारे देखील लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.

First published:

Tags: Pension, Pension funds, Pension scheme, Pensioners