GST रिटर्न - पाच कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना पुढील वर्षी जानेवारीपासून केवळ 4 सेल्स रिटर्न फाईल कराव्या लागतील. सध्या व्यवसायिकांना 12 रिटर्न दाखल करावे लागतात. त्याशिवाय 4 GSTR 1 भरावा लागतो. नवा नियम लागू झाल्यानंतर टॅक्सपेयर्सला केवळ 8 रिटर्न भरावे लागतील. यात 4 जीएसटीआर 3 बी आणि 4 GSTR 1 रिटर्न भरावा लागेल.
वीज कनेक्शन - विज मंत्रालय 1 जानेवारीपासून ग्राहक हक्क नियम लागू करण्याची तयारी करत आहे. यानंतर विज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना निर्धारित मुदतीत सेवा पुरवल्या पाहिजेत, असं करण्यात अपयशी ठरल्यास ग्राहक त्यांच्याकडून दंड वसूल करू शकतात. नियमांचा मसुदा कायदा मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ग्राहकांना नवीन कनेक्शनसाठी अधिक कागदपत्रांची गरज भासणार नाही.