मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Jan Dhan: केवळ एका मिस कॉलवरुन मिळवा तुमच्या खात्याची माहिती, असा तपासा बॅलेन्स

PM Jan Dhan: केवळ एका मिस कॉलवरुन मिळवा तुमच्या खात्याची माहिती, असा तपासा बॅलेन्स

जर तुम्हीही जनधन खातं (Jan Dhan Bank Account) ओपन केलं असेल, तर तुम्ही घर बसल्या केवळ एका मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) आपला बॅलेन्स चेक करू शकता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 जून: पंतप्रधान जनधन योजनेंअंतर्गत (PM Jan Dhan) ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. हे बँक खातं झिरो बॅलेन्स बचत खातं असतं. त्याशिवाय यात ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक सुविधा मिळतात. जर तुम्हीही जनधन खातं (Jan Dhan Bank Account) ओपन केलं असेल, तर तुम्ही घर बसल्या केवळ एका मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) आपला बॅलेन्स चेक करू शकता. जनधन खात्यातील बॅलेन्स दोन पद्धतींनी तपासता येऊ शकतो.

PFMS पोर्टल -

PFMS पोर्टलद्वारे बॅलेन्स चेक करण्यासाठी सर्वात आधी https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर जावं लागेल. इथे ‘Know Your Payment’ वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर एंटर करावा. इथे दोन वेळा अकाउंट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. आता खात्याचा बॅलेन्स समोर दिसू शकेल.

मिस्ड कॉल -

जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खातं असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे बॅलेन्सची माहिती घेऊ शकता. त्यासाठी 18004253800 या किंवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्वावा लागेल. ग्राहकांना आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन मिस्ड कॉल द्वावा लागेल.

(वाचा - 1 लाखांचा इन्शुरन्स आणि बरंच काही...; PM जनधन योजनेअंतर्गत बँक खात्याचे तुम्हाला माहिती नसलेले फायदे)

देशातले सगळे नागरिक बँकिंग यंत्रणेशी (Banking System) जोडले जावेत, या उद्देशाने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 42.37 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेत (PMJDY) अगदी गरिबातली गरीब व्यक्तीही खातं उघडू शकते.

First published:

Tags: Pradhan mantri jan dhan yojana