मराठी बातम्या /बातम्या /मनी /Diwali 2021: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना टॅक्सबद्दल 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Diwali 2021: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना टॅक्सबद्दल 'या' गोष्टी लक्षात ठेवा

सोनं खरेदी (Gold Buying) करताना आता एका महत्वाच्या नियमाकडे लक्ष द्या नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. तुम्ही सोनं कुठून खरेदी केलं किंवा आणलं याचा अधिकृत पुरावा तुम्ही जवळ बाळगलात तर घाबरायचं कारण नाही.

सोनं खरेदी (Gold Buying) करताना आता एका महत्वाच्या नियमाकडे लक्ष द्या नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. तुम्ही सोनं कुठून खरेदी केलं किंवा आणलं याचा अधिकृत पुरावा तुम्ही जवळ बाळगलात तर घाबरायचं कारण नाही.

सोनं खरेदी (Gold Buying) करताना आता एका महत्वाच्या नियमाकडे लक्ष द्या नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. तुम्ही सोनं कुठून खरेदी केलं किंवा आणलं याचा अधिकृत पुरावा तुम्ही जवळ बाळगलात तर घाबरायचं कारण नाही.

    मुंबई, 2 नोव्हेंबर : दिवाळीची (Diwali 2021) सुरुवात झाली आहे. आज (2 नोव्हेंबर 2021) धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2021) दिवशी सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी थोडं तरी सोन्याची खरेदी करावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यावेळेस जर तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्ही जर सोन्याची भरपूर खरेदी करण्याचं ठरवलं असेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा.

    सोनं खरेदी (Gold Buying) करताना आता एका महत्वाच्या नियमाकडे लक्ष द्या नाहीतर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते. तुम्ही सोनं कुठून खरेदी केलं किंवा आणलं याचा अधिकृत पुरावा तुम्ही जवळ बाळगलात तर घाबरायचं कारण नाही. मग तुम्ही अगदी तुमच्या घरातही हवं तेवढं सोनं ठेवू शकता. पण तुम्ही तुमचे इन्कम सोर्स (Income Source) सांगितल्याशिवाय जर सोनं घरात ठेवणार असाल तर त्यासाठी एक मर्यादा घालून देण्यात आली आहे.

    घरात एकावेळेस किती सोनं ठेवायची परवानगी?

    नियमानुसार विवाहित महिलेच्या घरी कोणत्याही उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय 500 ग्रॅम, अविवाहित महिलेच्या घरी 250 ग्रॅम तर पुरुषांना फक्त 100 ग्रॅम सोनं ठेवायची परवानगी आहे. या तीनही घालून दिलेल्या मर्यादेत सोनं असेल तर इन्कम टॅक्स तुमचे सोन्याचे दागिने जप्त करू शकत नाही.

    Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलियोतील 'या' स्टॉकमधून 50 टक्के रिटर्नची शक्यता

    मात्र जर या नियमामधील मर्यादेपेक्षा जास्त सोनं तुम्हाला ठेवायचं असेल तर उत्पन्नाचा दाखला असणं बंधनकारक आहे. जर एखाद्या नागरिकाला परंपरेनं, वारशानं मिळालेल्या सोन्यासोबत त्याचे अधिकृत स्रोत म्हणजेच त्या सोन्याचा लेखी पुरावा असेल तर तो नागरिक स्वत:जवळ कितीही प्रमाणात दागिने आणि आभूषणं ठेवू शकतो असं CBDT नं 1 डिसेंबर 2016 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

    ITR फाईल करताना माहिती देणे बंधनकारक

    जर तुमचं वार्षिक उत्पन्न (Annual Income) 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना (Income Tax Return or ITR) तुमच्याकडे असलेल्या दागिन्यांची जाहीर केलेली किंमत आणि मूळ किंमत (Original Value) यामध्ये कोणताही फरक नसावा. जर या किंमतीत फरक आढळला तर त्याचं कारण सांगणं बंधनकारक आहे.

    IndusInd Bank, Minda Corporation, SAIL या शेअर्सचं काय करायचं? एक्सपर्टचं मत काय?

    टॅक्सबाबतचा नियम काय आहे?

    सोनं प्रत्यक्ष खरेदी करताना 3 टक्के GST द्यावा लागतो. मात्र ग्राहक जेव्हा सोनं विकतो तेव्हा ते सोनं किती काळ तुमच्याजवळ आहे यावरून टॅक्स किती द्यायचा हे ठरवलं जातं. जर सोनं खरेदी केल्याच्या तारखेपासून तीन वर्षांत ते विकलं तर त्यातून मिळणाऱ्या पैशांना आणि अन्य प्रकारच्या फायद्यांना शॉर्ट टर्म कॅपिटल मानलं जातं आणि त्याला तुमच्या वार्षिक उत्पन्नाशी जोडलं जाऊन त्याबाबत ॲप्लिकेबल इन्कम टॅक्स स्लॅबनुसार (Applicable Income Tax Slab) टॅक्स आकारला जातो असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्याउलट तुम्हाला मिळालेलं हे सोनं तीन वर्षांनंतर तुम्हाला विकायचं असेल तर त्यातून मिळालेला पैसा लाँग टर्म कॅपिटल (Long Term Capital) मानलं जाईल आणि त्यावर 20 टक्के टॅक्स द्यावा लागेल. त्याचबरोबर इंडेक्सेशन बेनिफिट्स आणि 4 टक्के सेस आणि सरचार्जही लागेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना त्याच्या पावत्या आणि अन्य पुरावे नक्की मागून घ्या आणि त्या सांभाळून ठेवा.

    First published:

    Tags: Gold, Investment, Money