नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारतीयांमध्ये गोल्डची (Gold) जबरदस्त क्रेझ आहे. फेस्टिव्ह सीजन किंवा लग्नसमारंभावेळी याची मोठी खरेदी केली जाते. बदलत्या काळानुसार, फिजिकल गोल्ड अर्थात सोन्याची ज्वेलरी, शिक्का, बार, बिस्किट खरेदीसह आता डिजीटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणुकीचं प्रमाण वाढत आहे. डिजीटल गोल्ड तुमच्याकडे एक असा ऑप्शन आहे, ज्यात गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. केवळ एका रुपयातही तुम्ही डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. जागतिक स्तरावर गोल्ड कायमच गुंतवणुकीसाठी एक प्रमुख घटक राहिला आहे. काय आहे डिजीटल गोल्ड? डिजीटल गोल्ड म्हणजे तुम्ही सोनं ETFs, गोल्ड सेविंग फंड्स सारख्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये खरेदी करू शकता. डिजीटल गोल्डमध्ये कमीत-कमी 1 रुपयापासून गुंतवणूक करता येते. मार्केटमधील भाव पाहून तुम्ही जेव्हा हवं तेव्हा त्वरित खरेदी किंवा विक्री करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी तुम्ही फिजिकल फॉर्ममध्ये सोनं खरेदी करता, त्यावेळी सर्वात मोठी आव्हान ते घरात ठेवण्याचं असतं. फिजिकल सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर किंवा घरातच सुरक्षित ठिकाणी ते ठेवावं लागतं. डिजीटल गोल्डच्या सुरक्षेची चिंता करावी लागत नाही. फिजिकल गोल्डमध्ये दागिने, कॉइन किंवा इतर काही असल्यास ते सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी असते. डिजीटल गोल्ड इंश्योर्ड आणि सिक्योर्ड वॉल्ट्समध्ये सेलरकडून स्टोर केलं जातं. यासाठी ग्राहकाला कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.
हे वाचा - Digital Gold काय आहे? पाहा Google Pay, PhonePe वर कसं खरेदी कराल
फिजिकल गोल्डच्या तुलनेत डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणं एक सुरक्षित पर्याय आहे. डिजीटल गोल्डद्वारे तुम्हाला 24 कॅरेट गोल्डमध्ये गुंतवणुकीचा पर्याय मिळतो. या खरेदीनंतर ग्राहकाला प्योरिटी एश्योरन्स सर्टिफिकेट जारी केलं जातं. Digital Gold ची महत्त्वाची बाब म्हणजे, यात तुम्ही अगदी लहान रक्कमही केवळ 1 रुपयापासून गुंतवणूक करू शकता. तसंच कधी गरज लागल्यास ग्राहक या डिजीटल गोल्डची विक्रीही करू शकतो. शिवाय ग्राहक डिजीटल गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये कन्वर्ट करण्याचा पर्यायही निवडू शकतात. डिजीटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचा फायदाही असा होतो, की तुम्हाला सोन्याच्या लेटेस्ट रेटचे अपडेट लगेच मिळतात. ग्राहक रियल-टाइम मार्केटच्या आधारे गोल्ड खरेदी किंवा विक्री करू शकतात. भारतात प्रमुखत: 3 कंपन्या MMTC-PAMP India Pvt. Ltd, Augmont Gold Ltd आणि Digital Gold India Pvt Ltd आपल्या सेफगोल्ड ब्रँडसह डिजीटल गोल्ड ऑफर करतात. एयरटेल पेमेंट्स बँकदेखील (Airtel Payments Bank) सेफगोल्डसह भागीदारीमध्ये डिजीगोल्ड (DigiGold) ऑफर करतं. त्याशिवाय म्युचूअल फंड्समध्येही Gold SIP चा पर्याय आहे.