जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?

तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?

तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?

तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?

देशातील मोठी लोकसंख्या स्वतःच्या कष्टानं कमावलेले पैसे जोडून सोन्याचे दागिने खरेदी करते. अशा परिस्थितीत त्यांना कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. कोणाला हवं असल्यास ते त्यांच्या दागिन्यांचे हॉलमार्क त्यांच्या ज्वेलर्सद्वारे मिळवू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर: भारतीय मानक ब्युरोनं (BIS) सोन्याच्या दागिन्यांचं हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. तुम्ही सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करत असाल तर त्यावर हॉलमार्क आहे की नाही, यावर लक्ष ठेवा. जर तुम्ही घरात ठेवलेले जुने सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी किंवा पॉलिश करण्यासाठी जाणार असाल तर तुम्हाला हॉलमार्किंगचे कामही करून घेता येईल. तुमच्या जुन्या दागिन्यांवर हॉलमार्क चिन्ह नसलं तरीही तुम्ही ते विकू शकता. जुन्या दागिन्यांवरचं हॉलमार्किंगचं चिन्ह मिळवायचं असेल तर हे कामदेखील तुम्ही करू शकता. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं (BIS) 23 जून 2021 पासून सोन्याच्या दागिन्याचं हॉलमार्किंग अनिवार्य केलं होतं. त्यामुळं या सणासुदीच्या मोसमात तुम्ही बाजारात जाणार असाल तर तुमचं जुनं सोनं स्वच्छ करण्यासोबतच हॉलमार्किंगही करून घेऊ शकता. ज्वेलर्ससाठी हॉलमार्किंग अनिवार्य- भारत सरकारनं ग्राहकांच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन सोन्याचे दागिने आणि कलाकृतींमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. BIS च्या हॉलमार्किंग योजनेअंतर्गत ज्वेलर्सना हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी नोंदणी क्रमांक दिला जातो. तुमच्याकडे जुने दागिने असून त्यावर हॉलमार्क  चिन्ह नसलं तरीही ज्वेलर्स असं सोनं खरेदी करतील. हॉलमार्किंग फक्त ज्वेलर्ससाठी अनिवार्य आहे. हॉलमार्किंग फी- कोणाला हवं असल्यास ते त्यांच्या दागिन्यांचे हॉलमार्क त्यांच्या ज्वेलर्सद्वारे मिळवू शकतात. यासाठी ठराविक फी भरावी लागते. सरकारी आकडेवारीनुसार 1 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत सुमारे 3.7 कोटी दागिने हॉलमार्क करण्यात आले आहेत. त्याच वेळी, 2021-2022 मध्ये, एकूण 8.68 कोटी दागिने हॉलमार्क केले गेले. सोन्याच्या हॉलमार्किंगचे नियम फक्त ज्वेलर्ससाठी आहेत. ते ग्राहकांना हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाहीत. जर ग्राहकाकडे आधीपासून हॉलमार्किंगशिवाय दागिने असतील तर त्यावर परिणाम होणार नाही आणि पूर्वीप्रमाणेच विक्री करता येईल. एखाद्या ज्वेलर्सनं ग्राहकाकडून सोनं खरेदी करण्यास किंवा देवाणघेवाण करण्यास नकार दिल्यास त्याच्यावरही कारवाई होऊ शकते. हेही वाचा:  Gold Price Today: डॉलरचा सोन्यावर दबाव, ऐन दिवाळीत सोनं होणार स्वस्त?

 हॉलमार्क अनिवार्य का होते?

देशातील मोठी लोकसंख्या स्वतःच्या कष्टानं कमावलेले पैसे जोडून सोन्याचे दागिने खरेदी करते. अशा परिस्थितीत ग्राहक कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. आता ज्वेलर्सना सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क लावणं बंधनकारक आहे. जर एखादा ग्राहक हॉलमार्क असूनही सोन्याच्या शुद्धतेबद्दल असमाधानी असेल, तर तो हॉलमार्किंग केंद्रावर स्वतःहून सोन्याची तपासणी करून घेऊ शकतो. ग्राहकाचे आव्हान खरे असल्याचे सिद्ध झाल्यास ज्वेलर्सवर कारवाई करण्याची तरतूद आहे. यासोबतच ग्राहकांना भरपाईही दिली जाणार आहे. त्यासाठी देशभरातील शहरांमध्ये हॉलमार्किंग केंद्रेही उघडली जात आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

 गेल्या वर्षी सुरू झाली हॉलमार्क केंद्रे- हॉलमार्क अनिवार्य करण्याचा पहिला टप्पा 23 जून 2021 पासून लागू झाला. हॉलमार्क केंद्र असलेल्या 256 जिल्ह्यांमध्ये या नियमानुसार हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. दुसरा टप्पा 1 जून 2022 पासून लागू झाला. दुसऱ्या टप्प्यात अनिवार्य हॉलमार्क प्रणाली अंतर्गत 32 अतिरिक्त जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhanteras , gold , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात