मुंबई : सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीला चकाकी येते. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी देखील झपाट्याने वाढते. दिवाळीत पुन्हा एकदा सोनं स्वस्त होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. व्याजदर वाढल्याने गुंतवणूकदार चिंतेत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. परिणामी भारतातही सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय स्थिती कॉमेक्सवर मंगळवारी सोन्याचे भाव प्रति औंस 1670 डॉलरच्या खाली आले. चांदीच्या दरातही अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. याचा परिणाम भारतातील बाजारातही दिसू शकतो, सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवाळीपूर्वी दर दहा ग्रॅमला ५० रुपयांपर्यंत येऊ शकतो. डॉलरचं मूल्य वाढल्याने सोन्यावर दबाव निर्णय झाला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने स्वस्त झालं आहे.
Gold Price Today: डॉलरचा सोन्यावर दबाव, ऐन दिवाळीत सोनं होणार स्वस्त?कॉमेक्सवर या महिन्यात सोन्याचा भाव 1730 डॉलर प्रति औंस वरून 1670 यूएस डॉलर प्रति औंस झाला. 60 ने किंमती खाली घसरल्या आहेत, तर येत्या काळात आणखी किंमती खाली उतरण्याची शक्यता आहे असं रोज नोरमॅन यांचं म्हणणं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर नजर गुंतवणूकदारांचं लक्ष्य अमेरिकेतील वाढत्या व्याजदर आणि महागाईवर आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसोबत आशियातील मार्केटवरही झाला आहे. त्यामुळे सोन्यावरचा दबाव वाढला आहे. रशिया युक्रेन युद्धाचाही मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाल्याचं सांगितलं जात आहे. सोन्याचे दर घसरण्यामागचं कारण? सोन्याच्या दरात घसरण होण्याचे प्रमुख कारण अमेरिकेतील वाढलेले व्याजदर असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तिथल्या अहवालानुसार डिसेंबरपर्यंत यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा व्याजदरात दोनदा 0.75 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे.
दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार गुडन्यूज? सरकार घोषणा करण्याच्या तयारीतभारतात काय होणार? केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांनी सीएनबीसी टीव्ही 18 हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किमतीतील घसरणीचा कल दिवाळीपर्यंत कायम राहील. देशांतर्गत बाजारात याची किंमत 50 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत येऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे.