Home /News /money /

Education Loan : शैक्षणिक कर्जावर किती करसवलत मिळते? वाचा सविस्तर...

Education Loan : शैक्षणिक कर्जावर किती करसवलत मिळते? वाचा सविस्तर...

एज्युकेशन लोनच्या परतफेडीदरम्यान भरलेल्या व्याजावरही (Tax Exemption on interest of Education loan) करसवलत मिळवता येऊ शकते. त्या संदर्भातली तरतूद इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80 ई अंतर्गत आहे.

मुंबई 16, नोव्हेंबर : शिक्षणासाठी कर्जाची (Education Loan) सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे समाजाच्या बऱ्याच मोठ्या स्तरातल्या कुटुंबांचं आपल्या मुलांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. शिक्षणासाठीचं कर्ज अर्थात एज्युकेशन लोन घेतलं असेल, तर करसवलतही (Income Tax Rebate) मिळते. त्याबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे. त्या कर्जावर मिळणारं रिबेट किंवा सूट याबद्दलची माहिती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यापूर्वी असणं गरजेचं आहे. एज्युकेशन लोनवर आकारल्या गेलेल्या व्याजावरही करसवलतीचा लाभ घेता येतो. एका व्यक्तीला आपल्या दोन मुलांच्या शिक्षणावर एका वर्षात झालेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या खर्चासाठी इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 80 सी (IT Act Section C) अंतर्गत सवलत मिळू शकते. दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या व्यक्ती त्यापैकी कोणत्याही मुलांच्या शिक्षणाच्या खर्चावर करसवलत मिळवू शकतात. अर्थात ही करसवलत पूर्णवेळ शिक्षणासाठी केलेल्या खर्चावरच मिळू शकते. तसंच, ही सूट केवळ ट्यूशन फीवरच मिळते. एज्युकेशन लोनच्या परतफेडीदरम्यान भरलेल्या व्याजावरही (Tax Exemption on interest of Education loan) करसवलत मिळवता येऊ शकते. त्या संदर्भातली तरतूद इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80 ई अंतर्गत आहे. अर्थात व्याजावर करसवलत घेण्यासाठी काही अटीही आहेत. हे कर्ज महिला, तिचा पती किंवा मुलांकडून भारतातल्या किंवा परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी बँक किंवा वित्तसंस्थेकडून घेतलं गेलं असेल, तरच व्याजावरच्या करसवलतीचा लाभ मिळू शकतो. ज्या वर्षी कर्जफेड सुरू होते, त्या वर्षीपासून या करसवलतीचा दावा करता येऊ शकतो. तसंच, सात वर्षं किंवा कर्जफेडीचा कालावधी यांपैकी जो कालावधी कमी असेल, त्या कालावधीपर्यंत ही करसवलत घेता येऊ शकते. Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना एखाद्या व्यक्तीला दोन मुलं असतील आणि दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतलं असेल, तर कलम 80 ईअंतर्गत दोघांच्याही कर्जावर भरलेल्या व्याजासाठी करसवलतीचा दावा करता येतो. त्या करसवलतीला कमाल मर्यादा नाही. एक उदाहरण, एका व्यक्तीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीच्या शिक्षणासाठीच्या एज्युकेशन लोनवरच्या वार्षिक व्याजावर ती व्यक्ती करसवलतीचा लाभ घेते आहे. त्यानंतर त्या व्यक्तीने मुलाच्या शिक्षणासाठीही एज्युकेशन लोन घेतलं, तर त्या कर्जाच्या व्याजावरही करसवलतीचा दावा करता येऊ शकतो. PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे त्या व्यक्तीने दोन्ही मुलांसाठी 10 टक्के व्याजदराने प्रत्येकी 10-10 लाख रुपयांचं कर्ज घेतलं असेल, तर एकूण 20 लाख रुपयांच्या कर्जावर वार्षिक व्याज दोन लाख रुपये एवढं होईल. या दोन लाख रुपयांवर करसवलतीचा लाभ मिळेल. याचाच अर्थ असा, की एकूण करपात्र रकमेतून ही दोन लाख रुपये व्याजाची रक्कम वजा होईल. त्यामुळे साहजिकच कर कमी भरावा लागेल.
First published:

Tags: Education, Loan, Tax benifits

पुढील बातम्या