सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIAM) मते, ब्रेझा सप्टेंबर 2022 मध्ये सर्वाधिक विकली जाणारी SUV बनली आहे. या कारनं सब-कॉम्पॅक्ट SUV विभागातील अनेक लोकप्रिय कारना मागं टाकलं आहे. (मारुती सुझुकी)
गेल्या काही वर्षांत SUV भारतीय वापरकर्त्यांसाठी पसंतीची कार श्रेणी म्हणून उदयास आली आहे. 2015-16 च्या तुलनेत 2021-22 मध्ये सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट दुप्पट झाली आहे. (मारुती सुझुकी)
नवीन ब्रेझाच्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यात हेड-अप डिस्प्ले, इलेक्ट्रिक सनरूफ, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हील, स्मार्टप्ले प्रो+ इंफोटेनमेंट सिस्टम आणि इंटीरियर अॅम्बियंट लाइटिंग यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. (मारुती सुझुकी)
नवीन मारुती सुझुकी ब्रेझ्झाच्या कमांडिंग स्टांसमुळं तुम्ही शहरातील नवनव्या आव्हानांसाठी तयार असता. ड्युअल टोन एक्सटीरियरसह ते तरुण आणि उत्साही दिसते. (मारुती सुझुकी)
नवीन ब्रेझ्झामध्ये नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञान पाहायला मिळतं. या एसयूव्हीला इलेक्ट्रिक सनरूफ, स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो, जो ड्राइव्ह मोड आणि फ्युएल टँक इंडिकेटर यासारखी महत्त्वाची माहिती दाखवतो. (मारुती सुझुकी)