नवी दिल्ली, 16 जून : सध्याच्या काळात सेव्हिंग खूप आवश्यक आहे. अशा वेळी तुम्हाला गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा करायची असेल तर पीपीएफ हा बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. पण पीपीएफमध्ये एखादा गुंतवणुकदार किती अकाउंट ओपन करु शकतो याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण याचेच काही महत्त्वाचे नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के दराने व्याज मिळते. PPF वर उपलब्ध असलेला हा व्याजदर जुलै-सप्टेंबर तिमाहीत 8 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर ठरतं. परंतु त्यापूर्वी त्याच्याशी संबंधित नियम अवश्य जाणून घ्यायला हवेत.
PPF खाते कोण उघडू शकते? स्मॉल सेव्हिंग स्किमची सर्वात लोकप्रिय गुंतवणूक योजना पब्लिक प्रोव्हिडेंट फंडमध्ये कोणताही भारतीय आपल्या नावाने अकाउंट ओपन करु शकतो. यासोबतच, पालकांपैकी कोणीतरी एक अल्पवयीन मुलासाठी किंवा मुलीसाठी पीपीएफ खाते उघडू शकतो. दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास, आजी-आजोबा नातवंडांचे पालक म्हणून पीपीएफ खाते उघडू शकतात. PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! एका झटक्यात करता येईल सुरु, ही आहे प्रोसेस एक व्यक्ती किती पीपीएफ अकाउं ओपन करु शकते? PPF नियमांनुसार, एखादी व्यक्ती फक्त एक PPF अकाउंट उघडू शकते. कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी नाही. तसंच, काही प्रकरणांमध्ये असे दिसून आलंय की पीपीएफचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ अकाउंट उघडतात. PPF, FD, म्यूच्युअल फंडमधील पैसे कधी होतात डबल? समजून घ्या सोपं गणित PPF अकाउंटचा नियम घ्या जाणून पीपीएफ अकाउंट होल्डरने आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्याच्या अकाउंटमध्ये किमान 500 रुपये जमा केले नाहीत. तर डिफॉल्ट म्हणून प्रति वर्ष 50 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. यासोबतच, पीपीएफ अकाउंटचा गुंतवणूक कालावधी 15 वर्षे निश्चित केला जातो. गुंतवणूकदार 7 व्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी एकदा काढू शकतात, परंतु ही रक्कम 50 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. तसेच, PPF गुंतवणुकीसाठी किमान जमा रक्कम 500 रुपये प्रति वर्ष आणि कमाल मर्यादा रुपये 1,50,000 आहे.