मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC पॉलिसीधारकांनी PAN अपडेट करा, LIC च्या IPO मध्ये होईल मोठा फायदा

LIC पॉलिसीधारकांनी PAN अपडेट करा, LIC च्या IPO मध्ये होईल मोठा फायदा

एलआयसीने म्हटले आहे की एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. त्याने पॅन तपशील अपडेट करावेत.

एलआयसीने म्हटले आहे की एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. त्याने पॅन तपशील अपडेट करावेत.

एलआयसीने म्हटले आहे की एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. त्याने पॅन तपशील अपडेट करावेत.

मुंबई, 2 डिसेंबर : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (LIC) पॉलिसीधारकांना IPO मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम त्यांचा PAN अपडेट करावा लागेल. LIC च्या IPO इश्यू साईजचा 10 टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव आहे. एलआयसीने म्हटले आहे की एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. त्याने पॅन तपशील अपडेट करावेत.

जर एखाद्या पॉलिसीधारकाकडे सध्या वॅलिड डीमॅट अकाऊंट नसेल, तर त्याने स्वतःच्या खर्चाने ते उघडले पाहिजे. कॉर्पोरेशनने स्पष्टपणे सांगितले की पॉलिसीधारक डीमॅट खाते उघडण्याचा आणि पॅन अपडेट करण्याचा खर्च उचलेल. महामंडळ कोणताही खर्च उचलणार नाही. एलआयसी पॉलिसीधारकांसाठी त्यांच्या वेबसाइटवर पॅन अपडेट करण्यासाठी जाहिरात चालवत आहे.

आवश्यक कागदपत्रे

>> पॉलिसींच्या यादीसोबत तुमचे पॅन कार्ड ठेवा.

>>मोबाईल नंबर टाकावा लागेल.

>>एलआयसीमध्ये नोंद असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल.

Multibagger Stock : 9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर

तुमचा पॅन कार्ड क्रमांक LIC च्या डेटाबेसमध्ये नसल्यास याप्रमाणे अपडेट करू शकता

>> LIC च्या अधिकृत वेबसाईटला https://licindia.in/ भेट द्या.

>> ऑनलाईन PAN नोंदणीचा ​​पर्याय निवडा.

>> Proceed to the Online PAN नोंदणी पेजवर क्लिक करा. 'पुढे जा' बटणावर टॅप करा.

>> तुमचा ईमेल अॅड्रेस, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक भरा.

>> बॉक्समध्ये कॅप्चा कोड भरा.

>> तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून OTP साठी विनंती करा.

>> ओटीपी मिळाल्यावर तो भरा आणि सबमिट करा.

>> फॉर्म सबमिट केल्यानंतर, यशस्वी नोंदणीचा ​​संदेश येईल.

PAN-LIC कसे तपासायचे

>> https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा.

>> पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन माहिती तसेच कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर सबमिट बटण दाबा.

Sukanya Samriddhi Yojana : तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी याहून चांगली योजना नसेल! 18 व्या वर्षी मिळतील 65 लाख

LIC IPO

योजनेनुसार, LIC च्या IPO इश्यू प्राईजच्या 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. सरकारने फायनान्स अॅक्ट 2022 द्वारे प्रस्तावित IPO साठी LIC कायद्यात आवश्यक कायदेशीर सुधारणा आधीच आणल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एलआयसीचा आयपीओ 2021-22 मध्ये जारी केला जाईल असे सांगितले होते.

First published:

Tags: LIC, Money