जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Home Loan संपण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल मोठं नुकसान

Home Loan संपण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर होईल मोठं नुकसान

गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड?

गृहकर्जाचा EMI वेळेवर न भरण्याचे काय परिणाम होतात? कठीण प्रसंगांना कसं द्यावं तोंड?

गाडी किंवा घर खरेदी करण्याचं लोकांचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण लोन घेतो. ते मेहनत करून फेडतो मात्र शेवटच्या टप्प्यात काही गोष्टींक़डे दुर्लक्ष केल्यानं आपल्याला फटका बसू शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : तुम्ही जर लोन काढण्याच्या विचारात असाल किंवा तुमच्यावर लोन असेल घरातील इतर सदस्यांपैकी कोणी लोन काढलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. लोन क्लीअर होत आल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. नाहीतर त्याचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो. गाडी किंवा घर खरेदी करण्याचं लोकांचं स्वप्न असतं. त्यासाठी आपण लोन घेतो. ते मेहनत करून फेडतो मात्र शेवटच्या टप्प्यात काही गोष्टींक़डे दुर्लक्ष केल्यानं आपल्याला फटका बसू शकतो. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. लोन घेताना बँकेत आपली ओरिजनल डॉक्युमेंट जमा करणं बंधनकारक असतं. लोन पूर्ण होताना ही पुन्हा आपल्याकडे घेणं आवश्यक आहे. यासोबत अलॉटमेंट लेटर, पजेशन लेटर, लीगल डाक्यूमेंट सेल डीड, बिल्डर-बायर एग्रीमेंट, सेल एग्रीमेंट इत्यादी कागदपत्रही तपासून पाहायला हवीत. हे वाचा-ICICI बँकेकडून अलर्ट, या ग्राहकांना Transaction वर भरावे लागणार जास्त पैसे लोन संपत तेव्हा तुम्हाला फायनान्शियल कंपनीकडून ड्यूज सर्टिफिकेट दिलं जातं. ते सर्टिफिकेट न विसरता घ्यावं, त्यावर तुम्ही बँकेतून घेतलेली रक्कम पुन्हा बँकेला परत दिली आहे असं लिहिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही बँकेत गहाण ठेवलेली प्रॉपर्टी-पैसा यावर दुसऱ्या कोणालाही अधिकार मिळणार नाही. तुम्ही लोन घेता तेव्हा त्यासोबत बँक किंवा अन्य संस्था प्रॉपर्टी अधिकार जोडतात. लोन संपल्यानंतर तो अधिकार हटवण्यात आला की नाही हे तापसणं बंधनकारक आहे. ते सांगणं विसरलात तर बँक किंवा संस्था तुमच्या प्रॉपर्टीवर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे वाचा-ऑनलाइन पैसे ट्रांसफर करण्यासाठी UPI, NEFT, IMPS आणि RTGS काय आहे फायद्याचं? वाचा नॉन-एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट घेणं अत्यावश्यक आहे. ती प्रॉपर्टी किंवा गाडी किंवा अन्य वस्तू विकण्यासाठी तुम्हाला या सर्टिफिकेटची आवश्यकता लागू शकते. लोन संपल्यानंतर तुम्हाला क्रेडिट स्कोअर पाहाणं आवश्यक आहे. क्रेडिट प्रोफाईल अपडेट करणं जरूरी आहे. नाहीतर पुन्हा लोन काढण्यात अनेक अडचणी येऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात