मुंबई, 26 ऑक्टोबर : शहरी भागात स्वत:चं घर खरेदी करायचं असेल तर सहजरित्या बँक होम लोन उपलब्ध होतं. मात्र ग्रामीण भागात घर खरेदी करताना लोनसाठी बऱ्याच अडचणी येतात. मात्र आता ग्रामीण भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण स्वत:चे घर खरेदी करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेकडून (India Post Payments Bank) ग्रामीण भागातील नागरिकांनाही होम लोन मिळणार आहे. यासाठी इंडिया पोस्ट बॅंकने एचडीएफसीसोबत (HDFC) भागीदारी केली.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीशी भागीदारी करत या अंतर्गत पेमेंट बँकेच्या सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील ग्राहकांची (Home Loan Facility in rural area) गरज लक्षात पोस्ट ऑफिसने हा निर्णय घेतला आहे. याचा फायदा नक्की ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे.
Bajaj Finance Q2 Result : बजाज फायनान्सच्या निव्वळ नफ्यात 53 टक्क्यांनी वाढ
एचडीएफसी बँकेच्या देशभरात 650 शाखा असून 1.36 लाख बँकिंग अॅक्सेस पॉईंट्स आहेत. बँकेच्या या नेटवर्कच्या मदतीने नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन दिलं जाणार आहे, असं एचडीएफसी बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण वर्गाला गृहकर्ज देत नाही, असे इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकचे व्यवस्थापकीय संचालक जे वेंकटरामू यांनी सांगितलं.
एचडीएफसी बँक आणि इंडिया पोस्ट बँक या भागीदारीद्वारे होमलोन प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. ज्या ठिकाणी बँकिंग सुविधांचा विस्तार नाही, अशा ठिकाणी गृहकर्जाच्या सुविधेचा विस्तार करण्यासाठी इंडिया पोस्ट बँकेकडून सुमारे 1,90,000 पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांद्वारे गृहकर्ज देण्याचा विचार आहे.
Top Gainer & looser : सेंसेक्समध्ये 383 अंकाची वाढ, TATA चे शेअर्स 4 टक्क्यांनी वधारले
एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू सूद कर्नाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसीच्या 25 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना आतापर्यंत याचा लाभ मिळाला आहे. 30 जूनपर्यंत या लाभार्थ्यांना 43,000 कोटी रुपयांची प्रतिपूर्ती आणि 5,800 कोटी रुपयांचे अनुदान मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hdfc bank, Home Loan, Money, Post office bank