नवी दिल्ली, 24 डिसेंबर: सोने-चांदीच्या (Gold-Silver Rates Today) दरात सध्या सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आज आठवड्यातल्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी चांदीचे दर घसरले आहेत, तर सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) आज फेब्रुवारीत डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या दरात 0.07 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. चांदीचे व्यवहार 0.01 टक्क्यांची किरकोळ घसरण होऊन सुरू आहेत.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की दिवाळीच्या वेळी सोन्याची भरपूर विक्री झाली. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर विवाहांचा हंगाम सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. सोन्याचा दर (Gold Rates) हळूहळू प्रति 10 ग्रॅमला 50 हजार रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. सोबतच फंडामेंटलही मजबूत बनले आहेत.
फेब्रुवारीत डिलिव्हरी असलेल्या सोन्याचे भाव आज 0.07 टक्के तेजीसह 48,185 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत आहेत.
सराफा बाजारात आज चांदीच्या भावात तेजीची नोंद केली जात आहे. आज चांदीची 0.01 टक्क्यांनी किरकोळ घसरण होऊन प्रति किलो दर 62,303 रुपये झाला आहे.
सोने-चांदीचे दर घरबसल्या जाणून घेणं आता सोपं झालं आहे. यासाठी 8955664433 या मोबाइल क्रमांकावर केवळ मिस्ड कॉल द्यावा लागतो. त्यानंतर फोनवर एक मेसेज येतो आणि त्यात सोने-चांदीचे ताजे दर दिलेले असतात.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने एक अॅप तयार केलं आहे. BIS Care app च्या साह्याने ग्राहक सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करू शकतात. या अॅपच्या साह्याने सोन्याच्या शुद्धतेची तपासणी तर केली जातेच, शिवाय याच्याशी संबंधित काही तक्रार असेल तर तीही करता येते.
या अॅपमध्ये लायसेन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबरची (Hallmark Number) माहिती चुकीची असल्याचं कळलं, तर ग्राहक याची लगेच तक्रार करू शकतात. ती तक्रार कशी दाखल करायची, याची माहितीही याद्वारे लगेच मिळते.
इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटचं लाँचिंग एखाद्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून किंवा मग नव्या स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून होणार आहे. सेबीने मान्यता दिल्यानंतर या ईजीआरची मिनिमम व्हॅल्यू (EGR minimum value) निश्चित केली जाईल. ईजीआरमध्ये खरेदी केल्यानंतर खरेदीदार त्याला सोन्यामध्येही रुपांतरित करू शकतील. गोल्ड एक्स्चेंजमध्ये ईजीआरमार्फत खरेदी केलेलं गोल्ड फिजिकल (EGR to Physical gold) स्वरूपात डिलिव्हरी करण्याचाही पर्याय असेल, असं सेबीनं स्पष्ट केलं आहे. गोल्ड एक्स्चेंजमुळे देशातली सोने खरेदी-विक्री अधिक पारदर्शक होईल, असा विश्वास सेबीने व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold price, Gold prices today