मराठी बातम्या /बातम्या /मनी /Home loan EMI : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत घर कर्जाचा हफ्ता फेडणं जातंय अवघड? या गोष्टींचा विचार नक्की करा

Home loan EMI : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत घर कर्जाचा हफ्ता फेडणं जातंय अवघड? या गोष्टींचा विचार नक्की करा

अचानक नोकरी गेल्याने अनेकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही ज्यांनी महामारी येण्यापूर्वी गृहकर्ज (Home Loan)घेतले होते,त्यांच्या समस्या अधिक बिकट आहेत.

अचानक नोकरी गेल्याने अनेकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही ज्यांनी महामारी येण्यापूर्वी गृहकर्ज (Home Loan)घेतले होते,त्यांच्या समस्या अधिक बिकट आहेत.

अचानक नोकरी गेल्याने अनेकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही ज्यांनी महामारी येण्यापूर्वी गृहकर्ज (Home Loan)घेतले होते,त्यांच्या समस्या अधिक बिकट आहेत.

  नवी दिल्ली, 23 मे : सध्या देशभरात कोरोनामुळे (Corona) गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका उद्योग-व्यवसाय आणि रोजगार क्षेत्राला (Employment) मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले कडक निर्बंध आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर उद्योग-व्यवसाय बहुतांशी ठप्प आहेत. अनेकांना आपली नोकरी जातीय की काय अशी भीती वाटत आहे. कारण अनेक कंपन्या खर्च कमी करण्याच्या नावाखाली आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहेत. यामुळे वाढती बेरोजगारी ही बाब चिंतेची ठरत आहे.

  अचानक नोकरी गेल्याने अनेकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातही ज्यांनी महामारी येण्यापूर्वी गृहकर्ज (Home Loan)घेतले होते,त्यांच्या समस्या अधिक बिकट आहेत. ज्यांनी असे कर्ज घेतले आहे परंतु,ते आता कर्जाचे मासिक हप्ते भरु शकत नाहीत अशांच्या मालमत्ता कर्ज देणाऱ्या संस्था जप्त करीत आहेत.

  आपल्या नावावर किंवा आपल्याकडे दिर्घ मुदतीसाठीचे गृह कर्ज (Long Term Home Loan)असेल आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने त्याची परतफेड करणं अवघड झालं असेल किंवा परतफेड होऊ शकत नसेल तर तुम्ही खालील पैकी एक किंवा सर्व पध्दतींचा वापर करुन बघू शकता.

  हे ही वाचा-1.5 कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट! व्हेरिएबल DA मध्ये दुप्पट वाढ

  कर्जफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकाराचा (moratorium)फायदा घ्यावा

  रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार,कर्ज देणाऱ्या प्रमुख संस्थांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्ज घेणाऱ्यास किंवा कर्जदारास तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज परतफेडीसाठी स्थगिती द्यावी. ही स्थगिती गृह कर्जासाठी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी लागू आहे. याचा अर्थ असा की या कालावधीत कर्जदाराने आपल्या कर्जाचे हप्ते भरले तर त्यास डिफॉल्टर (Defaulter)म्हणून घोषित केले जाणार नाही. तसेच जे कर्ज परत फेड करु शकणार नाहीत त्यांना कर्ज परतफेड पुढे ढकलण्यासाठी अधिकृत कायदेशीर मान्यता दिली जाईल.

  टप्प्याटप्प्यात परतफेड धोरण अवलंबा

  बऱ्याच संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने पगार देत असून तो नोटीस कालावधीतील रकमेइतकाच आहे. जर तुम्ही आपली नोकरी गमावली असले आणि कंपनीकडून टप्प्याटप्प्याने वेतन मिळवले असेल तर किरकोळ खर्चात वाया घालवू नका. याचा उपयोग ईएमआय (EMI)भरण्यासाठी करा. यामुळे कर्ज परतफेड न केल्याने जो दंड तुम्हाला भरावा लागतो,त्यापासून तुम्ही मुक्त व्हाल.

  आपल्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम वापरा

  तुमच्या कमाईचा एक भाग कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (EPF)खात्यात जमा होतो. गृह कर्जाचे हप्ते भरण्यासाठी यातून पैसे काढणे यासाठी यापेक्षा अजून योग्य वेळ कोणती असू शकते. सरकारी नियमांनुसार,आपल्या ईपीएफ खात्यातून महागाई भत्यासह 75 टक्क्यांपर्यंत बचत किंवा तीन महिन्यांपर्यंतच्या मूलभुत पगाराची रक्कम काढता येते. तुम्हाला नवी नोकरी मिळेपर्यंत या ईपीएफ खात्यातील रकमेचा वापर तुम्ही कर्ज परतफेड करण्यासाठी करु शकता. यासाठी अर्ज केल्यानंतर 3 दिवासांत पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. यामुळे तुमच्यावरील कर्जाचे ओझे कमी होऊ शकते.

  प्रियजनांकडून कर्ज घेऊ शकता

  तुम्ही तुमचे नातेवाईक किंवा मित्रांकडून काही रक्कम उधार किंवा कर्ज स्वरुपात घेऊ शकता. ही रक्कम नक्कीच व्याजरहित असेल. फक्त यासाठी तुम्हाला पैशांची किती गरज आहे हे संबधित व्यक्तीला पटवून द्यावे लागेल.

  गुंतवणूक मोडा आणि ती रक्कम वापरा

  तुम्ही केलेली गुंतवणूक (Investment)आणि निश्चित ठेवींचा अंदाज घ्या. त्यातील काही रक्कम कर्ज परतफेडीसाठी वापरता येते का याचा विचार करा. आपल्या कर्जातील एक मोठा परतफेड करण्यासाठी बचत केलेली संपूर्ण रक्कम वापरण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्हाला पुन्हा नोकरी मिळेपर्यंत तुमच्या कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी आवश्यक आहे तितकीच रक्कम बचतीतून काढा.

  विमा पॉलिसीवर कर्ज घेणं टाळा

  जर तुम्ही विमा पॉलिसी (Insurance Policy)घेतली असेल तर त्या पॉलिसीवर कर्ज घेणं टाळा. या पॉलिसीव्दारे तुमचे कर्ज सुरक्षित केले जाईल परंतु,असुरक्षित वैयक्तिक कर्जापेक्षा या कर्जावरील व्याजदरही कमी असतील. याशिवाय विमा कंपनी तुमचे कर्ज त्वरित मंजूर करेल आणि कर्जाची रक्कम देखील त्वरित वितरित करेल कारण तुम्ही विमा कंपनीचे जुने ग्राहक आहात.

  हे ही वाचा-विमा कव्हर घेताय? या तीन पद्धतींनुसार ठरवा विम्याची योग्य रक्कम किती असावी

  म्युचअल फंडाची पूर्तता करा

  तुमच्याकडे म्युचअल फंड (Mutual Fund)असेल आणि ते मॅच्युअर झाले असतील तसेच त्याची रक्कम गुंतवणुक केलेल्या रकमेच्या तुलनेत अधिक असेल तर त्याची पूर्तता करुन ती रक्कम कर्ज परतफेडीसाठी वापरणं शहाणपणाचं ठरेल. मालमत्ता त्याच्या वेगाने वाढू दिली जाणे आवश्यक आहे,असा एक नियम आहे. परंतु,त्या डोक्यावर कर्ज असताना या मालमत्तांवरील व्याज आणि नफ्यावर दुर्लक्ष करणे जास्त गरजेचं असतं.

  न भरलेले गृह कर्ज तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम करु शकते.कर्जाच्या परतफेडीवर डिफॉल्ट आढळल्यास कर्ज देणाऱ्या संस्था तुमच्या परतफेडीच्या रेकॉर्डचा तपशील सीआयबीआयएल (CIBIL)आणि अन्य क्रेडिट रेटींग संस्थांना पाठवतात. याचा अर्थ असा की कदाचित आपणास केवळ आपली संपत्ती गमवावी लागेल,परंतु,भविष्यात इतर बॅंकांकडून किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या व्यतरिक्त तुमची बॅंक लेट फि आणि डिफॉल्टबाबतचे शुल्कही आकारु शकते,यामुळे तुमच्यावरील कर्जाचं ओझं आणखी वाढू शकते.

  First published:

  Tags: Home Loan, Investment, Pension funds