नवी दिल्ली, 22 मे: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) शुक्रवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व्हेरिएबल डिअरनेस अलाउन्समध्ये (Variable DA) वाढ करण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा 1.5 कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सुरुवातीला व्हेरिएबल डीए 105 रुपये प्रति महिना होता, ज्यामध्ये वाढ करून तो आता 210 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2021 पासून हा नवीन व्हेरिएबल डीए प्रभावित असेल.
या महागाई भत्त्यामुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या किमान पगारामध्येही वाढ होणार आहे. रेल्वे, खाणकाम, तेलक्षेत्र, बंदरे आणि केंद्र सरकारच्या इतर आस्थापनांमधील कर्मचार्यांना याचा फायदा होईल. हा दर कंत्राटी किंवा कॅज्युअल दोन्ही कर्मचार्यांना तितकाच लागू असेल.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बातचीत करताना सेंट्रल चीफ लेबर कमिश्नर (CLC) डीपीएस नेगी यांनी अशी माहिती दिली की, केंद्राच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये प्रति महिना 105 रुपयांवरून 210 रुपयांइतकी वाढ केली आहे.
Rate of Variable Dearness Allowance given to workers engaged in various scheduled employments in central sphere, Ministry of Labour & Employment, increased from 1st April, 2021. Benefits will be given with immediate effect, benefitting about 1.50 cr workers: Union Min S Gangwar pic.twitter.com/pqBbFAGned
— ANI (@ANI) May 21, 2021
हे वाचा-SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून 23 मेपर्यंत मिळणार नाहीत या सेवा
श्रम मंत्रालयाच्या मते, 'सध्या देश COVID-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. अशावेळी केंद्रीय क्षेत्रातील विविध अनुसूचित रोजगारात काम करणार्या कामगारांच्या विविध श्रेणीतील कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, यासाठी भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने 1.4.2021 पासून व्हेरिएबल डिअरनेस अलाउन्सच्या दरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.'
हे वाचा-या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! Appraisal फॉर्म भरण्याची तारीख वाढवली
कामगार मंत्रालयाने सुधारित व्हीडीए जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत औद्योगिक कामगारांच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) च्या आधारे निश्चित केला. केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी व्हेरिएबल डीए (व्हीडीए) चा आढावा घेते आणि तो केंद्रीय कर्मचार्यांना दिला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Dearness allowance, Modi government, Money