नवी दिल्ली 22 एप्रिल: लग्नसराईला सुरुवात होताच सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे. मागील दोन महिन्यांमध्येच सोन्याच्या किमतीत 4000 रुपयांपर्यंतची वाढ नोंदवली गेली आहे. फेब्रुवारीमध्ये सोन्याचा दर 45,600 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. आता हे दर 48,000 रुपयांहून अधिक झाले आहेत. मागील दोन दिवसांत देशातील बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. सध्या तरी आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर उच्चांकावर म्हणजेच 56 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते. दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे. गुरुवारी एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या वायद्यात 0.04% टक्क्यांची घट झाली आहे. सोन्याचे नवे दर आता 48,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. फक्त 131 रुपये गुंतवून मिळतील 20 लाख; सरकारची ही योजना माहिती आहे का? चांदीचे दर - चांदीच्या किमतीतही (Silver Price) आज घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सराफा बाजारात गुरुवारी चांदीचा वायदा 0.05% टक्क्यांनी खाली आला असून दर 70,304 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. Gold Price Today: उतरले सोन्याचे दर, चांदीच्या दरात मात्र उसळी; वाचा आजचा भाव सोन्याचे दर पुन्हा गाठणार उच्चांक ? भारतात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा वाढत आहे. अशात गुंतणुकदार पुन्हा एकदा सोन्याच्या खरेदीकडे वळताना दिसत आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किमती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. यामुळे पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.