Home /News /money /

Petrol Diesel Price: 10 दिवसांत नव्यांदा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती; जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

Petrol Diesel Price: 10 दिवसांत नव्यांदा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती; जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

गेल्या 10 दिवसांपासून इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळपासून पुन्हा तेलाच्या किमती वाढवल्याची घोषणा केली आहे

    नवी दिल्ली 31 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी (Petrol Diesel Price Today) पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून इंधनाच्या दरात (Fuel Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळपासून पुन्हा तेलाच्या किमती वाढवल्याची घोषणा केली आहे. बुधवारी रात्रीच तेल कंपन्यांनी केलेल्या घोषणेनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून लागू झाली आहे. प्रमुख शहरांतील इंधनाचे दर - दिल्ली - दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोलच्या किमती 100.21 होत्या तर आज यात वाढ झाली असून दर 101.1 वर पोहोचला आहे. मुंबई - मुंबईत बुधवारी पेट्रोलचे दर 115.04 इतके होते, आज ते 115.88 वर पोहोचले आहेत. कोलकाता - कोलकात्यात पेट्रोलचे दर बुधवारी 109.68 होते, आज ते 110.52 झाले आहेत. चेन्नई - चेन्नईमध्ये बुधवारी दर 105.94 होते, ते आज गुरुवारी 106.69 वर पोहोचले आहेत. Multibagger Penny Stock | 1 लाख रुपयांचे झाले 3 कोटी रुपये, 8 वर्षांत 35 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न देणारा शेअर एकंदरीत सगळ्याच शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 9 वेळा वाढ करण्यात आली आहे. 22 मार्चपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 6.20 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दरवाढीनंतर 31 मार्च रोजी दिल्लीत पेट्रोल 101.1 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यामागे पुरवठ्यातील समस्या असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की, युक्रेनमधील युद्धामुळे जगातील सर्व देश प्रभावित झाले आहेत. याचाच फटका भारतालाही बसला आहे. EPFO अकाउंट असणाऱ्यांनी 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा करावा लागेल पश्चाताप' देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या