नवी दिल्ली 19 एप्रिल : आज सोन्याच्या दरात वाढ (Gold Price Today) झाल्याचं पाहायला मिळालं आहे, तर चांदीच्या दरात (Silver Price Today) मात्र घट नोंदवली गेली आहे. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा जूनचा वायदा 116 रुपयांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 47469 प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. तर, चांदी 0.46 घसरुन 68,367 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. मात्र, अजूनही सोनं आपल्या उच्चांकापेक्षा 9085 प्रति दहा ग्रॅम स्वस्तच आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता सोन्याचे भाव पुन्हा मागील वर्षीप्रमाणे उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किमती लवकरच पुन्हा एकदा 50 हजाराच्या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्यानं आर्थिक अनिश्चिततेमुळे बॉन्ड यिल्डमध्ये घसरण, डॉलरच्या किमतीत घट आणि सोन्याच्या जागतिक मागणीत तेजी पाहायला मिळू शकते.
कोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार? जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज
आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 50430 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत. तर, मुंबईमध्ये 46020, चेन्नईमध्ये 48580, कोलकातामध्ये 49020 प्रति दहा ग्रॅम अशा किमती आहेत.
15 दिवसांत 6 टक्के वाढली किंमत; पुन्हा प्रतितोळा 56,000 रुपये गाठणार सोनं?
कोरोना काळात गुंतवणुकदारांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. मागील वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अरब डॉलर म्हणजेच 2.54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षात चांदीची आयात 71 टक्क्यांनी घसरुन 79.1 कोटीवर आली.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दराने उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं. यानंतर सोनं अगदी 11,500 रुपयांनी घसरलं होतं. पण आता हळूहळू सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Prices