Gold Silver Price : 15 दिवसांत 6 टक्के वाढली किंमत; पुन्हा प्रतितोळा 56,000 रुपये गाठणार सोनं?

Gold Silver Price : 15 दिवसांत 6 टक्के वाढली किंमत; पुन्हा प्रतितोळा 56,000 रुपये गाठणार सोनं?

Gold Silver Price : गेले काही दिवस सोन्याच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 18 एप्रिल : सोन्याचांदीच्या (Gold Silver Rate Today) किंमतीत सध्या चढ उतार सुरू आहे. सराफा बाजारात सोन्याची किंमत (Gold rate) वाढली आहे. सोबतच चांदीचे दरही (Silver rate) वाढले आहेत. गेल्या 15 दिवसांत सोन्याचे दर 6 टक्के वाढले आहेत. त्यामुळे गेले काही दिवस स्वस्त झालेलं सोनं (Gold price) आता पुन्हा महाग होणार का? प्रति तोळा 45 हजारांच्या खाली आलेलं सोनं पुन्हा 56 हजारांचा उच्चांक गाठणार का? असे बरेच प्रश्न आता तुमच्याही मनात निर्माण झाले असतील.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दराने उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं होतं. यानंतर सोनं अगदी 11,500 रुपयांनी घसरलं होतं. पण आता हळूहळू सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. 45 हजारांच्या खाली असलेलं सोनं 45 हजारांच्या पार गेलं आहे. गेल्या 15 दिवसांत एमसीएक्समध्ये सोन्याची किंमत 6 टक्क्यांनी वाढून सोनं प्रति ग्रॅम 47,000 वर पोहोचलं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4 टक्क्यांनी वाढून 1781 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

हे वाचा - दुष्काळात तेरावा महिना! कोरोनाच्या वाढत्या संकटात आता हेल्थ इन्शुरन्सही महागणार?

कोरोनाचा धोका पुन्हा वाढतो आहे त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव वाढण्यासाठी अनेक कारणं आहेत. ज्यामुळे पुढील येत्या दिवसांत सोन्याचे दर असे चढेच राहतील. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार 2021 मध्येही सोन्याची किंमत वाढणं अटळ आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं. यावर्षी सोन्याची किंमत नवे रेकॉर्ड बनवणार आहे. सोनं प्रतितोळा 63,000 रुपये पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Published by: Priya Lad
First published: April 18, 2021, 7:58 AM IST

ताज्या बातम्या