जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तब्बल 1869 कोटी रुपये सॅलरी; हा आहे सर्वाधिक पगार घेणारा 'भारतीय'

तब्बल 1869 कोटी रुपये सॅलरी; हा आहे सर्वाधिक पगार घेणारा 'भारतीय'

प्रतीकात्मक फोटो - Canva

प्रतीकात्मक फोटो - Canva

इतका पगार कुणाला आहे आणि ही व्यक्ती काय करते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल ना?

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 जुलै : कुणी म्हणतं कुणी एक लाख सॅलरी आहे, कुणी म्हणतं 2 लाख, कुणी 3 लाख… पण सर्वाधिक पगार घेणारा भारतीय कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? त्याचा पगार इतका की वाचूनच तुम्हाला चक्कर येईल. असा भारतीय जो काही हजारो, काही लाखो नाही तर तब्बल 1869 कोटी रुपये सॅलरी घेतो. आता हा कर्मचारी कोण आणि तो नेमकं काय करतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तामिळनाडूमधील मदुराईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना क्रिकेटची आवड. एका नामांकित आयआयटी संस्थेचे ते विद्यार्थी होते. 2022 साली त्यांचं सॅलरी पॅकेज 226 दशलक्ष डॉलर्स होतं. म्हणजे तब्बल 1869 कोटी रुपये. या रकमेत 218 दशलक्ष डॉलर्सच्या स्टॉक ऑप्शन अवॉर्डचा समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना 281 दशलक्ष डॉलर्सचा पुरस्कार मिळाला होता. हुरुन लिस्टनुसार, 2022 मध्ये त्यांनी एकूण संपत्तीच्या 20 टक्के संपत्ती गमावल्यानंतरही त्यांची एकूण संपत्ती तब्बल 1310 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 10215 कोटी रुपये होती. लहान मुलांचा आवाज ऐकून घराबाहेर आले हर्ष गोयंका, पण ‘ते’ दृश्य पाहून शॉक; असं काय दिसलं पाहा VIDEO एका मध्यमवर्गीय कुटुंबातून इतकी श्रीमंत झालेली ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही तर सुंदर पिचाई आहेत. गुगलचे सीईओ. त्यांची आई लक्ष्मी स्टेनोग्राफर होती. वडील रेगुनाथ हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. पिचाई यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनीअरिंग केलं. ते सिल्व्हर मेडालिस्ट होते. नंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून मटेरिअल सायन्समध्ये एमएस केलं. त्यानंतर व्हार्टन स्कूलमधून एमबीए केलं. 2004 साली गुगलमध्ये ते प्रोडक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाले. गुगल क्रोमच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2008 मध्ये त्यांना उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली. चार वर्षांनंतर ते वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. 2014 मध्ये ते प्रोडक्ट चीफ झाले. 2015 साली ते गुगलचे CEO बनले. 2019 मध्ये ते Alphabet Inc या मूळ कंपनीचे CEO बनले. दोन श्वानांसाठी विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये बुकिंग! दिल्लीपासून कॅनडापर्यंत करणार प्रवास त्यांच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे तो त्यांची पत्नी अंजली पिचाई यांचा. अंजली या मूळच्या कोटाच्या त्यांनीही आयआयटी खरगपूरमधून केमिकल इंजिनिअरिंग केलं. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई

पिचाई सीईओ होण्यापूर्वी त्यांना अनेक कंपन्यांकडून ऑफऱ आली होती. पण त्यांच्या पत्नीने त्यांना गुगल न सोडण्याचा सल्ला दिला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google , money , Salary
  • First Published :
जाहिरात
जाहिरात