जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Health Policy Portability: मोबाईल सिमप्रमाणे हेल्थ पॉलिसीही करता येते पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस!

Health Policy Portability: मोबाईल सिमप्रमाणे हेल्थ पॉलिसीही करता येते पोर्ट, जाणून घ्या प्रोसेस!

हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटी

हेल्थ पॉलिसी पोर्टेबिलिटी

Health Policy Portability: तुम्ही पहिलेच एखादी हेल्थ पॉलिसी घेऊन ठेवली आहे आणि तुम्हाला ती सर्व्हिस आवडत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही मोबाईल सिम प्रमाणे तुमची हेल्थ पॉलिसी सहज पोर्ट करु शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    Health Policy Portability: आपलं भविष्य सुरक्षित करण्यापूर्वी आपलं जीवन सुरक्षित करणं गरजेचं आहे. याच कारणामुळे बहुतांश एक्सपर्ट सल्ला देतात की, तुम्ही गुंतवणुकीसोबतच हेल्थ पॉलिसी अवश्य घेतली पाहिजे. कोविड दरम्यान हेल्थ पॉलिसीची गरज चांगल्या प्रकारे समजली आहे. तुम्ही पहिलेच एखादी हेल्थ पॉलिसी घेऊन ठेवली आहे आणि तुम्हाला याची सर्व्हिस आवडलेली नाही तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही मोबाईल सिमप्रमाणे हेल्थ पॉलिसीही सहज पोर्ट करु शकता. चला तर मग जाणून घेऊया हेल्थ पॉलिसी पोर्ट करण्याची प्रोसेस काय… 45-60 दिवस अगोदर अप्लाय करा तुमची जुनी कंपनी बदलल्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीत हेल्थ पॉलिसी घ्यायची आहे, त्याबद्दल आधी नीट माहिती करून घ्या, मगच ती निवडा. म्हणजे पुन्हा-पुन्हा कंपनी बदलण्याची गरज भासणार नाही. यासोबतच, तुम्हाला पॉलिसी एक्सपायर होण्याच्या 45-60 दिवस आधी पोर्टसाठी अप्लाय करावं लागेल. तुम्ही हे स्वतः करू शकता किंवा तुम्ही एखाद्या फायनेंशियल प्लानरकडून हे करू शकता. Life Insurance Loan: लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवरही घेऊ शकता लोन, जाणून घ्या काय आहेत नियम भरावे लागतील हे फॉर्म नवीन कंपनी निवडल्यानंतर अॅप्लीकेशन फॉर्म भरा. यानंतर, नवीन कंपनी तुम्हाला पोर्टेबिलिटी आणि प्रपोजल फॉर्म पाठवेल. त्यानंतर तुम्ही हे दोन्ही फॉर्म भराल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि आधीच्या इन्शुरन्स कंपनीची माहिती द्यावी लागेल. पॉलिसी खरेदी केल्यानंतर, 30 दिवसांचा वेटिंग पीरियड, जुन्या आजारांसाठी वेटिंग पीरियड, विशिष्ट रोगांसाठी वेटिंग पीरियड आणि जुन्या पॉलिसीचा नो क्लेम बोनस देखील नवीन पॉलिसीमध्ये ट्रान्सफर केला जाऊ शकतो. Insurance : सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स म्हणजे काय? जाणून घ्या कठीण काळात कसा येत राहतो पैसा या कागदपत्रांची असेल आवश्यकता पॉलिसी पोर्ट करताना तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये हेल्थ इन्शुरन्सला रिन्यू करण्याशी संबंधित नोटीस किंवा मागील वर्षाच्या पॉलिसी शेड्यूल, नो क्लेम बोनस क्लेम करायचा असल्यास एक घोषणापत्र, एखादा क्लेम केला असेल तर डिस्चार्ज समरी, तपास आणि फॉलो-अप रिपोर्ट, मागील मेडिकल हिस्ट्री, रिपोर्ट आणि कॉपी इत्यादींचा समावेश आहे. या गोष्टी ठेवा लक्षात पॉलिसी पोर्ट करण्यापूर्वी, तुम्ही एक गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की, तुम्ही फक्त त्या पॉलिसी पोर्ट करू शकता ज्या रेग्युलर आहेत. जर एखादी हेल्थ पॉलिसी कोणत्याही कारणास्तव मध्येच बंद झाली असेल, तर तुम्ही ते इतर कोणत्याही कंपनीकडे पोर्ट करू शकत नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात