Home /News /money /

Share Market Investment : यंदाच्या वर्षात या सेक्टरमध्ये बंपर कमाईची संधी, काय आहेत कारणं? वाचा सविस्तर

Share Market Investment : यंदाच्या वर्षात या सेक्टरमध्ये बंपर कमाईची संधी, काय आहेत कारणं? वाचा सविस्तर

शेअर बाजारात डिजिटल, ईव्ही (Electric Vehicle), तंत्रज्ञान, AI (Artificial Intelligence) सारखी क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी पर्याय म्हणून उदयास आली आहेत. 2020 मध्ये, नवीन तंत्रज्ञान आणि EV सेगमेंटने वाढत्या बाजारपेठेत आपले स्थान कसे मजबूत केले हे बाजाराने पाहिले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 जानेवारी : भारतीय शेअर बाजाराने (Share Market) 2021 मध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. या बुल रनमध्ये काही क्षेत्रांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. त्याचबरोबर आता कोणते क्षेत्र मोठा नफा देईल, हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर कायम आहे. आता डिजिटल, ईव्ही (Electric Vehicle), तंत्रज्ञान, AI (Artificial Intelligence) सारखी क्षेत्रे गुंतवणूकदारांसाठी पर्याय म्हणून उदयास आली आहेत. 2020 मध्ये, नवीन तंत्रज्ञान आणि EV सेगमेंटने वाढत्या बाजारपेठेत आपले स्थान कसे मजबूत केले हे बाजाराने पाहिले. येथे आम्ही तुम्हाला अशा 4 क्षेत्रांबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढे जाणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीचे प्रमुख पर्याय असतील. AI (Artificial Intelligence) मल्टीमॉडल आणि लिंग्विस्टिक (Multimodel and Linguistic) क्षेत्रात, 2022 पर्यंत, तांत्रिक प्रगतीला वेग येण्याची अपेक्षा आहे. गुंतवणूकदारांना कॉल सेंटर अॅनालिटिक्स, कस्टमायझेशन आणि क्लाउड यूज ऑप्टिमायझेशनमध्ये व्यावसायिकीकृत AI हवे आहे, ज्यामुळे निधी मिळू शकेल. AI क्षेत्रात, Tata Elxsi, Persistent, Bosch, Oracle, Happiest Minds सारख्या कंपन्या 2022 साठी चांगली ठरू शकतात. तुमच्याकडेही असं PAN Card असेल तर भरावा लागेल 10 हजारांचा दंड, वाचा नियम 5G टेक 5G ला अजून काही वेळ लागू शकतो. जर तुम्ही अस्थिरता सहन करू शकत असाल, तर गुंतवणुकीसाठी हे एक चांगले क्षेत्र असू शकते. अनेक 5G कंपन्या अजूनही प्लानिंद फेजमध्ये आहेत. काही नवीनतम आणि सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होण्यापूर्वी भविष्याचा अंदाज लावत आहेत. त्यामुळे आता या व्यवसायांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. गुंतवणूकदारांनी अशा कंपनीत गुंतवणूक करावी ज्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. 2022 मध्ये देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू होण्याचा अंदाज आहे. गुरुग्राम, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, मुंबई, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, जामनगर, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ आणि गांधीनगर ही शहरे 2022 मध्ये 5G तंत्रज्ञान सुरु करतील. Jio, Bharti Airtel आणि Vodafone Idea (Vi) यांनी या शहरांमध्ये आधीच 5G ट्रायल साइट्स सेट केल्या आहेत. म्हणजेच भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल ईव्ही क्षेत्रात चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. आधीच, भारतातील अनेक राज्य सरकारांनी देशांतर्गत आणि जागतिक पुरवठादारांकडून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, गेल्या वर्षी, भारत सरकारने नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन विकसित केला आहे, ज्याचा उद्देश हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय इंधन सुरक्षा वाढवणे आहे. भारतीय शेअर बाजारात, टाटा मोटर्स (Tata Motors), हिरो मोटरकॉर्प (Hero Motocorp), टीव्हीएस (TVS), महिंद्रा (Mahindra&Mahindra) यांसारख्या ईव्ही क्षेत्रातील काही नावे आहेत. शेअर बाजारात उडी घेण्याचा विचार करताय? वाचा Zerodha संस्थापक नितीन कामत यांच्या यांच्या टिप्स डिजिटल इंडिया डिजिटल ग्राहकांसाठी भारत ही सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. लाखो भारतीयांसाठी, यामुळे श्रमाचे स्वरूप बदलेल तसेच प्रचंड आर्थिक मूल्य निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. भारताने 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट स्वतःसाठी ठेवले आहे. भारत सरकारचा “डिजिटल इंडिया” उपक्रम हा 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. डिजिटल पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीमुळे जीडीपी चार पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. IRCTC, Paytm, Jio, CDSL आणि InfoEdge ही या क्षेत्रासाठी काही चांगली नावे आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या