मुंबई, 29 जानेवारी : HDFC Securities ने एंजल वन लिमिटेडला ( Angel One Ltd.) BUY रेटिंग देत त्यासाठी 1750 रुपयांचे टार्गेट दिले आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, पुढील सहा महिन्यांत हे टार्गेट गाठता येईल. काल 28 जानेवारी रोजी हा शेअर 1,409 रुपयांच्या आसपास बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल वर्षभरात दुपटीने वाढून 445 कोटी रुपये झाला आहे. तिमाही आधारावर 15 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ ब्रोकिंग रेव्हेन्यू तिमाही आधारावर 19 टक्क्यांहून अधिक वाढून 2.75 अब्ज रुपये झाला आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून काही नियम बदलणार, तुमच्यावर काय परिणाम होणार? चेक करा या कालावधीत कंपनीची सरासरी प्रति ग्राहक ऑर्डर 22.6 च्या सर्वकालीन उच्च पातळीवर आहे. या काळात कंपनीचा डेरिव्हेटिव्ह रेव्हेन्यू खूपच प्रभावी ठरला आहे. याशिवाय, तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे नेट इंटरेस्ट इनकम तिमाही आधारावर 12 टक्क्यांनी वाढून 80.3 लाख रुपये झाली आहे, तर EBITDA मार्जिन 50.8 टक्के आहे, हा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही आधारावर 23 टक्के आणि वार्षिक आधाराव 125 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा कस्टमर अक्वेझिशन रन रेट देखील मजबूत पातळीवर राहिला आहे. या कालावधीत कंपनीसोबत दर महिन्याला 4.6 लाख नवीन ग्राहक जोडले जातात. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत 13.4 लाख नवीन ग्राहक जोडले गेले, तर आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत, 12.8 लाख नवीन ग्राहक कंपनीसोबत जोडले गेले. ITR Filing : आयकर भरण्याची शेवटची तारीख विसरु नका, उशीर केला तर जेलही होऊ शकते एचडीएफसी सिक्युरिटीजचा विश्वास आहे की कंपनीच्या व्यवसायात पुढेही चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेऊन, हा स्टॉक 1410 -1440 च्या दरम्यान आढळल्यास आणि 1230 च्या आसपास पडल्यास खरेदी करावी. हा स्टॉक पुढील 2 तिमाहीत 1750 रुपयांची पातळी दाखवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.