मुंबई, 21 फेब्रुवारी : वर्धमान टेक्सटाईल (Vardhman Textiles) भारतातील एक लीडिंग पूर्णतः इंटिग्रेटेड टेक्सटाईल कंपनी आहे एचडीएफसी सिक्युरिटीजला (HDFC Securities) विश्वास आहे की सुती धाग्याच्या मागणीतील मजबूत तेजीचा या स्टॉकला फायदा होईल. विशेष म्हणजे, अमेरिकेने चीनच्या शिंजियान प्रांतातून येणाऱ्या सुती धाग्यावर बंदी घातली आहे. या बंदीमुळे वर्धमान टेक्सटाइलसह भारतीय कंपन्यांना फायदा होईल, असा विश्वास एचडीएफसी सिक्युरिटीला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे असे मत आहे की गुंतवणूकदारांनी हा मल्टीबॅगर स्टॉक 2580-2600 रुपयांच्या श्रेणीत खरेदी करावा. याशिवाय, जर 2230-2270 रुपयांच्या श्रेणीत घसरण होत असेल तर थांबून टप्प्याटप्प्याने यात खरेदी करावी. पुढील 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 2770 ते 3030 ची पातळी पाहता येईल. Multibagger share: दोन रुपयांच्या स्टॉकची मोठी झेप; एक लाख बनले 1.81 कोटी एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, पाश्चिमात्य देशांतील कॉटन धाग्याचे आयातदार त्यांच्या आयातीसाठी चीनशिवाय इतर बाजारपेठा शोधत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी भारत हा एक चांगला पर्याय असू शकतो. कॉटन धाग्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन खूप मजबूत दिसत आहे. याचे कारण असे की जागतिक किरकोळ विक्रेता त्याच्या पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी चीन व्यतिरिक्त इतर स्त्रोत शोधत आहे. Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील ‘या’ शेअरला BUY रेटिंग, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस आर्थिक वर्ष 2022 च्या तिसर्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अतिशय मजबूत आहे. कंपनीने या कालावधीत तिच्या कमाईत 49 टक्के वार्षिक वाढ पाहिली आहे आणि ती 2,603 कोटींच्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. HDFC सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की चालू VTL चा महसूल/EBITDA/PAT मध्ये आर्थिक वर्ष 2021-24 या कालावधीत वार्षिक 20/40/53 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या बोर्डाने नुकतेच कंपनीचे प्रति शेअर 10 रुपयांचे फेस वॅल्यू भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून 2 रुपये शेअरमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. VTL शेअर्समध्ये 1 वर्षात 127 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.