जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरला BUY रेटिंग, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरला BUY रेटिंग, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' शेअरला BUY रेटिंग, चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस

बीएसईवर उपलब्ध कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची डिसेंबर 2021 च्या तिमाहीसाठी VA Tech Wabag कंपनीत 8.04 टक्के भागीदारी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : FY22 च्या तिसर्‍या तिमाहीत VA Tech Wabag चा (VA Tech) महसूल वर्षाच्या तुलनेत टक्क्यांनी घसरून 7.5 अब्ज झाला. विशेष म्हणजे या कालावधीत कंपनीच्या ईपीसी सेगमेंटमध्ये वर्षभरात 7 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या एकूण उत्पन्नावर दिसून आला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने (ICICI Securities) सांगितले की, या परिस्थितीतही, औद्योगिक आणि परदेशातील ऑर्डर चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊनही कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे. FY 2022 च्या 9 महिन्यांतील कंपनीची मजबूत कामगिरी आणि मजबूत ऑर्डर बुक लक्षात घेऊन, ICICI सिक्युरिटीजने VA टेकचे रेटिंग Hold वरून ADD वर केले आहे ज्याचे टार्गेट 365 ते 366 रुपये आहे. Online PF Transfer साठी आहे सोपी प्रोसेस, पाहा कसं कराल अप्लाय ICICI सिक्युरिटीजने या स्टॉकवर नुकत्याच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात जल-जीवन मिशनवरील तरतूद वाढवून 600 अब्ज रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे, नमामि गंगे फेज 2 शी संबंधित निविदा लवकरच येण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, ईएसजी नियम कडक केल्याने, पाण्याशी संबंधित प्रकल्पांना गती मिळेल. हे पाहता, औद्योगिक ऑर्डर उचलण्याची अपेक्षा करतो. कंपनीने औद्योगिक आणि केंद्र सरकारच्या केंद्रीत प्रकल्पांसाठी जल प्रक्रिया विभागात लक्षणीय कौशल्य विकसित केले आहे, ज्यामुळे कंपनीला पुढे जाण्याचा फायदा होईल. Multi Option Deposit गुंतवणुकीचा उत्तम पर्याय, ATM मधूनही पैसे काढता येतील आयसीआयसीआय सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीच्या एकूण मार्जिनमध्ये 2.80 टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपनीचे EBITDA मार्जिन वर्षिक 1.40 टक्क्यांनी वाढले आहे आणि ते 10.2 टक्के झाले आहे. त्याचप्रमाणे, कंपनीचा EBITDA आणि नफा याच कालावधीत वार्षिक आधारावर 8.6 टक्के आणि 9 टक्क्यांनी वाढला आहे. तिसर्‍या तिमाहीत, कंपनीला 9.6 अब्ज रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आणि तिची एकूण ऑर्डर बुक 100 अब्ज डॉलर झाली. बीएसईवर उपलब्ध कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची डिसेंबर 2021 च्या तिमाहीसाठी कंपनीत 8.04 टक्के भागीदारी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात