Home /News /money /

PPF ते सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांचे व्याजदर जैसे थे; काय आहेत सध्याचे व्याजदर?

PPF ते सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांचे व्याजदर जैसे थे; काय आहेत सध्याचे व्याजदर?

लघू बचत योजनांवरील व्याजदर (Interst on Small Savings) त्रैमासिक आधारावर ठरवले जातात. सध्याच्या दरांनुसार, एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्के व्याजदर कायम राहील.

    मुंबई, 1 जानेवारी : सरकारने नवीन वर्षात अल्पबचत योजनांच्या (small savings schemes) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. PPF, NSC सह सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर पूर्वीप्रमाणेच राहतील. या योजनांचे व्याजदर, जे आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत होते, नवीन वर्षात तेच राहतील. सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 या तिमाहीसाठी अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर 1 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या तिमाही व्याजदराच्या पातळीवरच राहतील, असं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे. लघू बचत योजनांचे व्याजदर लघू बचत योजनांवरील व्याजदर (Interest on Small Savings) त्रैमासिक आधारावर ठरवले जातात. सध्याच्या दरांनुसार, एक वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्के व्याजदर कायम राहील. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के असेल. या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. गुंतवणुकीला कलम 80सी अंतर्गत सूट मिळते. GST कलेक्शन डिसेंबर 2021 मध्ये 1.29 लाख कोटींवर, नोव्हेंबरच्या तुलनेत घट पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 7.4 टक्के असेल. एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.5-6.7 टक्के दराने व्याज मिळेल, जे तिमाही आधारावर दिले जाईल. किसान विकास पत्र व्याज दर किसान विकास पत्राचा (Kisan Vikas Patra) व्याजदर 6.9 टक्के आहे. किसान विकास पत्राची मॅच्युरिटी 124 महिन्यांची आहे. यामध्ये वार्षिक आधारावर व्याज मोजले जाते. या योजनेत किमान 1000 रुपये जमा करता येतील. कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही. Business Idea: Ola सोबत काम करा, हजारो रुपये कमावा; कसा सुरु करायचा बिझनेस? PPF आणि NSC माहितीनुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रोविडंट फंड (PPF) वर 7.1 टक्के वार्षिक व्याजदर आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत 6.8 टक्के दर मिळत राहील. लहान बचत योजना (Small Saving Scheme) लहान बचत योजनांमधील गुंतवणुकीवर कर सवलतीच्या लाभासह सरकारी हमी उपलब्ध आहे. या योजनांमध्ये, थोडी रक्कम जमा केली जाते, जी बँकेच्या FD पेक्षा जास्त परतावा देते. लघु बचत योजनांवरील व्याजदर त्रैमासिक आधारावर ठरवले जातात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या