Home /News /money /

HDFC बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! बॅंकेकडून FD व्याजदरात वाढ; नवीन व्याजदर चेक करा

HDFC बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! बॅंकेकडून FD व्याजदरात वाढ; नवीन व्याजदर चेक करा

एचडीएफसी बॅंकेने हा निर्णय बुधवारी (18 मे 22) जाहीर केला. हे नवे दर 18 मे 2022 पासून लागू झाले आहेत. सामान्य नागरिकांसाठी 1 ते 2 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर एचडीएफसी बॅंकेने 5.10 टक्के हा व्याजदर कायम ठेवला आहे.

    मुंबई, 18 मे : आजच्या काळात आर्थिक नियोजनाला (Financial Planning) अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडे पुरेशी पुंजी असावी, या दृष्टिकोनातून बहुतांश लोक गुंतवणूक (Investment) किंवा बचतीला (Saving) प्राधान्य देतात. फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी (FD) हा बचतीचा सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. तुम्ही जर एफडी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण देशातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वांत मोठ्या एचडीएफसी बॅंकेने (HDFC Bank) दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडींवरील व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. `टीव्ही 9 हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. एचडीएफसी बॅंकेने हा निर्णय बुधवारी (18 मे 22) जाहीर केला. हे नवे दर 18 मे 2022 पासून लागू झाले आहेत. बॅंक 7 ते 29 दिवासांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 2.50 टक्के व्याज (Interest) देणार आहे. 30 ते 90 दिवसांमध्ये मॅच्युअर (Mature) होणाऱ्या एफडीवरील 3 टक्के व्याजदर कायम असेल. सर्वसामान्य लोकांना 91 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडींवर 3.50 टक्के व्याजदर मिळेल. 6 महिने 1 दिवसापासून ते 9 महिन्यांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज मिळेल. एचडीएफसी बॅंक 9 महिने 1 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज देत आहे. मात्र आता या कालावधीतील व्याजदर 4.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात 10 बेसिस पॉईंट्सची (Basis Points) वाढ करण्यात आली आहे. Vanilla शेतीतून लाखोंची कमाई करा, तुमच्या शेतीत घेता येईल का पीक? जाणून घ्या माहिती सामान्य नागरिकांसाठी 1 ते 2 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर एचडीएफसी बॅंकेने 5.10 टक्के हा व्याजदर कायम ठेवला आहे. यापूर्वी 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षादरम्यान मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 5.20 टक्के व्याजदर दिला जात होता. पण आता त्यात 20 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली असून, हा दर आता 5.40 टक्के असेल. 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर बॅंक 5.60 टक्के व्याज देणार आहे. या पूर्वी हा दर 5.45 टक्के होता. या दरात 15 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली आहे. 5 वर्षं 1 दिवस ते 10 वर्षादरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी यापूर्वी 5.60 टक्के व्याजदर होता. परंतु, आता त्यात 15 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली असल्याने हे व्याज आता 5.75 टक्के असेल. एचडीएफसी बॅंकेचे एफडी वरील 2022 साठीचे व्याजदर याप्रमाणे असतील. 7 ते 14 दिवसांसाठी 2.50 टक्के,15 ते 29 दिवसांसाठी 2.50 टक्के, 30 ते 45 दिवसांसाठी 3.00 टक्के, 46 ते 60 दिवसांसाठी 3.00 टक्के, 61 ते 90 दिवसांसाठी 3.00 टक्के, 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीसाठी 3.50 टक्के, 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांसाठी 4.40 टक्के, 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापर्यंत 4.50 टक्के, 1 वर्षासाठी 5.10 टक्के, 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षादरम्यान 5.10 टक्के, 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंत 5.40 टक्के, 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षापर्यंत 5.60 टक्के तर 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षापर्यंत 5.75 टक्के असा व्याजदर मिळेल. Whatsapp वर दोन मिनिटात मिळवा होम लोन; HDFC बँकेची खास सुविधा, चेक करा प्रोसेस एचडीएफसी बॅंक ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) अतिरिक्त व्याज (Extra Interest) देणं सुरूच ठेवणार आहे. 7 दिवस ते 5 वर्षांसाठीच्या डिपॉझिटवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. बॅंकेची विशेष योजना असलेल्या सीनिअर सिटिझन केअर एफडीत ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष कालावधीच्या एफडीवर सध्या देण्यात येत असलेल्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाशिवाय 0.25 टक्के अधिक व्याज मिळेल. सीनिअर सिटिझन केअर एफडी योजनेत नागरिक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा व्याज दर या पूर्वी 6.35 टक्के होता. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर वाढवून 6.50 टक्के करण्यात आला आहे.
    First published:

    Tags: Fixed Deposit, Hdfc bank, Investment, Money

    पुढील बातम्या