जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vanilla शेतीतून लाखोंची कमाई करा, तुमच्या शेतीत घेता येईल का पीक? जाणून घ्या माहिती

Vanilla शेतीतून लाखोंची कमाई करा, तुमच्या शेतीत घेता येईल का पीक? जाणून घ्या माहिती

Vanilla शेतीतून लाखोंची कमाई करा, तुमच्या शेतीत घेता येईल का पीक? जाणून घ्या माहिती

केसरनंतर व्हॅनिला (Vanilla) सर्वांत महागड्या पिकांपैकी एक आहे. मादागास्कर, पापुआ न्यू गिनी, भारत आणि युगांडा यांसारख्या देशांमध्ये याची लागवड होते. व्हॅनिला रोपाच्या फळाचा आकार कॅप्सुलसारखा असतो.

    मुंबई, 18 मे : व्हॅनिला फ्लेवर (Vanilla Flavour) अनेकांना आवडतो. व्हॅनिलाचा स्वाद अनेकांना रिफ्रेश करतो. आईस्क्रीमपासून केकपर्यंत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये व्हॅनिला फ्लेवरचा वापर केला जातो. त्याशिवाय सेंट (Scents), परफ्यूममध्येही (Perfumes) या फ्लेवरचा वापर केला जातो. कॉफीपासून रिफ्रेशिंग ड्रिंक्सपर्यंत अनेक पेयांमध्ये व्हॅनिला इसेन्स हमखास असतोच. सरासरी लोकप्रिय असणारा हा फ्लेवर आहे. बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला फ्लेवर व्हॅनिलाच्या शेंगांमधल्या बियांपासून (Vanilla Beans) तयार केला जातो. केसरनंतर व्हॅनिला सर्वांत महागड्या पिकांपैकी एक आहे. मादागास्कर, पापुआ न्यू गिनी, भारत आणि युगांडा यांसारख्या देशांमध्ये याची लागवड होते. व्हॅनिला रोपाच्या फळाचा आकार कॅप्सुलसारखा असतो. स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, जगभरात तयार होणाऱ्या आईस्क्रीममध्ये (Ice Cream) व्हॅनिला फ्लेवरचा वापर 40 टक्क्यांपर्यंत केला जातो. व्हॅनिला फळाचा सुगंध मनमोहक असतो. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांसाठीही त्याचा वापर होतो. परिणामी, बाजारात व्हॅनिलाच्या फळांना आणि बियांना चांगली मागणी असते. व्हॅनिलाची शेती (Vanilla Farming) भारतात होते. तुम्ही जर शेतात वेगळा प्रयोग करण्याचा विचार करत असाल तर व्हॅनिलाची शेती करू शकता. त्यासाठीची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. Mango Season : मधुमेह असलेल्या लोकांसाठी आंबा खाणे सुरक्षित आहे का? भुसभुशीत माती व्हॅनिला लागवडीसाठी अतिशय चांगली व्हॅनिला लागवडीसाठी भुसभुशीत माती अतिशय चांगली मानली जाते. जमिनीचा पी.एच. 6.5 ते 7.5 रोपांसाठी चांगला मानला जातो. व्हॅनिला झाडाला ऑर्किड कुटुंबातील सदस्य म्हटलं जातं. या बियांमधून उगवणाऱ्या रोपांची देठं सरळ लांब आणि दंडगोलाकार असतात. या संदर्भात आज तक ने वृत्त प्रसिद्ध केलंय. व्हॅनिलाच्या बियांचा प्रतिकिलो दर किती? व्हॅनिलाची फुलं (Vanilla Flower) तयार होण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर रोपांमधून बिया काढल्या जातात. या बियानंतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जातात. सध्या भारतात व्हॅनिलाच्या बियांचे दर 40 ते 50 हजार रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे व्हॅनिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. शरीरावरील एका छोट्याशा तिळाने वाचवला मॉडेलचा जीव; भयंकर आजाराचं वेळीच झालं निदान व्हॅनिलाचे फायदे काय? व्हॅनिलामध्ये व्हॅनिलिन नावाचा रासायनिक घटक आढळतो. डॉक्टरांच्या मते, हा घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. याशिवाय त्याची फळं आणि बिया कॅन्सरसारख्या (Cancer) गंभीर आजारांवर खूप प्रभावी मानल्या जातात. यासोबतच पोट स्वच्छ ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी, ताप यासारख्या किरकोळ आजारांना दूर ठेवण्यासाठी व्हॅनिलाचे सेवन करणं फायदेशीर आहे. अशाप्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आणि महागड्या व्हॅनिलाचं उत्पादन करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , health
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात