Home /News /money /

HDFC बँकेला पुन्हा जारी करता येणार नवीन क्रेडिट कार्ड, RBI चा मोठा दिलासा; वाचा सविस्तर

HDFC बँकेला पुन्हा जारी करता येणार नवीन क्रेडिट कार्ड, RBI चा मोठा दिलासा; वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने एचडीएफसी बँकेला (HDFC Bank News) मोठा दिलासा दिला आहे. RBI ने 2 डिसेंबर 2020 रोजी बँकेवर काही निर्बंध आणले होते, त्यासंदर्भात हे महत्त्वाचं अपडेट आहे.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने एचडीएफसी बँकेला (HDFC Bank News) मोठा दिलासा दिला आहे. RBI ने 2 डिसेंबर 2020 रोजी बँकेवर आणलेले निर्बंध अंशत: हटवत नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास (New Credit Card Issuance) परवानगी दिली आहे. गेल्यावर्षी खासगी क्षेत्रातील या मोठ्या बँकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. तांत्रिक कमतरतेमुळे बँकेच्या सेवांवर मोठा परिणाम झाला होता. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन डिजिटल बँकिंग उपक्रम आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर निर्बंध आणले होते. RBI ने थर्ड पार्टीकडून केलं आयटी इंफ्रा ऑडिट आरबीआयने निर्बंध आणण्याआधी एप्रिल-नोव्हेंबर 2020 दरम्यान एचडीएफसी बँकेने दरमहा 1 लाखांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड कस्टमर बँकेशी जोडले होते. दरम्यान आरबीआयने फेब्रुवारी 2021 मध्ये एका कंपनीला बँकेचे आयटी इंफ्रास्ट्रक्चर ऑडिट करण्यास नियुक्त केले होते. HDFC चे मुख्य सूचना अधिकारी रमेश लक्ष्मीनारायणन यांनी जून 2021 मध्ये अशी माहिती दिली होती की बँकेने सर्व आकलन पूर्ण केली आहेत. शिवाय ज्या तांत्रिक कमतरता होत्या त्या देखील दूर केल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रिय बँकेन एचडीएफसीवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा-दुप्पट होणार PM Kisan चा फायदा? 2000 ऐवजी मिळणार 4000,काय आहे मोदी सरकाची योजना? HDFC ने जुलैमध्ये पूर्ण केल्या होत्या सर्व अटी बँकेवर निर्बंध येण्याआधी ही खासगी बँक क्रेडिट कार्ड क्षेत्रात आघाडीवर होती. दरम्यान त्याआधी दोन वर्षात बँकेच्या ग्राहकांना अनेकदा इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगमध्ये खराब प्रणालीमुळे तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. अनेकदा बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद पडले होते. त्यामुळे  HDFC बँकेच्या Digital 2.0 या उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांसाठी नवीन कार्ड्स लाँच करण्याच्या सेवा थांबवण्याचे आदेश दिले होते यामध्ये नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावरही बंदी आणली होती. गेल्या महिन्यात बँकेचे सीईओ शशिधर जगदीशन यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने सर्व अटींचे पालन केले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Bank details, Bank services, Hdfc bank

    पुढील बातम्या