Home /News /money /

दिवाळीपूर्वी या बँकेने स्वस्त केलं होम लोन; जाणून घ्या किती कमी होईल EMI

दिवाळीपूर्वी या बँकेने स्वस्त केलं होम लोन; जाणून घ्या किती कमी होईल EMI

रिटेल होम लोन आणि नॉन-होम लोन ग्राहकांना या कपातीचा फायदा मिळणार आहे. नवे दर आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता स्वस्त दरात होम लोन उपलब्ध होणार आहे.

  नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : गृहकर्ज (home loan) घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. HDFC Ltd ने प्राइम लँडिंगच्या रेट्समध्ये 10 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. हाउसिंग फायनान्स कंपनी HDFC ने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. HDFC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कमी केलेल्या पॉईंट्सचा लाभ सर्व HDFC रिटेल होम लोन आणि नॉन-होम लोन ग्राहकांना या कपातीचा फायदा मिळणार आहे. नवे दर आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता स्वस्त दरात होम लोन उपलब्ध होणार आहे. HDFC ने एका निवेदनात सांगितलं की, रिटेल प्राइम लँडिंग रेट्समध्ये  (RPLR) 10 बेसिस पॉईंट्सची कपात करत आहे.  HDFC आपल्या होम लोनवर फ्लोटिंग रेट्स (Floating interest rate)रिटेल प्राइम लेंडिग रेट्सच्या आधारे ठरवते. म्हणजेच, RPLR याचा बेंचमार्क लँडिंग रेट आहे. HDFC वेबसाईटनुसार, होम लोनचा व्याज दर 6.90 पासून सुरू होत आहे. या कमी दराचा फायदा नवीन आणि सध्याच्या सर्व ग्राहकांना मिळणार आहे. (वाचा - Gold Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे भाव) बँक ऑफ बडोदा - याआधी बँक ऑफ बडोदाने रेपो रेटसंबंधी लोन इंट्रेस्ट रेट सात टक्क्यांनी कमी करुन 6.85 टक्के केलं होतं. बँकेचे नवे दर 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू करण्यात आले आहेत.

  (वाचा - PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स)

  कॅनरा बँक - कॅनरा बँकेनेही (Canara bank) मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट्समध्ये (MCLR) 0.05 ते 0.15 टक्क्यांची कपात केली आहे. बदललेले दर 7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. यूनियन बँक ऑफ इंडिया - Union bank of India नेही होम लोन स्वस्त केलं आहे. 30 लाख रुपयांहून अधिकच्या होम लोनवर, व्याज दरात 0.10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. महिला कर्जदारांना याप्रकारच्या कर्जावर, व्याज दरात 0.05 टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्यामुळे महिल्यांना व्याज दर 0.15 टक्के स्वस्त पडेल. यूनियन बँक ऑफ इंडियाने 31 डिसेंबर 2020 पर्यंत होम लोनवरील प्रोसेसिंग फीदेखील शून्य केली आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Pay the loan

  पुढील बातम्या