Gold Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे भाव

Gold Price: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवे भाव

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत गेल्या 7 वर्षातील, सर्वात मोठी घसरण झाली आहे. याचाच परिणाम आज भारतीय बाजारावरही पाहायला मिळाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : कोरोना वॅक्सिनबाबत आलेल्या चांगल्या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत गेल्या 7 वर्षातील, सर्वात मोठी घसरण झाली आहे. याचाच परिणाम आज भारतीय बाजारावरही पाहायला मिळाला. आज मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 662 रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलोग्रॅम चांदीच्या दरात 1431 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, टक्क्यांच्या हिशोबाने सोन्याच्या दरात 2013 नंतर ही एका दिवसातली सर्वात मोठी घसरण आहे. याच संकेतांचा परिणाम घरगुती बाजारावरही दिसला. भारतीय बाजारात सोन्याची किंमती आणखी घसरू शकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

(वाचा - Gold Price: सोन्याच्या किंमतीत मागील 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण; हे आहे कारण)

आजचे सोन्याचे नवे दर (Gold Price, 10 November 2020) -

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 662 रुपयांनी घसरुन 50,338 प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. तर एक दिवस आधी सोमवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 51000 रुपये होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव घसरुन आता 1881 डॉलर प्रति औंस इतका आहे.

चांदीचा आजाचा दर (Silver Price, 10 November 2020) -

मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचे दर 1431 रुपयांनी कमी झाले आहेत. आजा नवा दर 62,217 प्रति किलोग्रॅम इतका आहे. सोमवारी एक किलोग्रॅम चांदीचा दर 63,648 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा दर 24.31 डॉलर प्रति इतका आहे.

(वाचा - खूशखबर! Corona Vaccine च्या उत्पादनास सुरुवात, 3 कोटी डोस तयार असल्याचा दावा)

सोने दरात का होतेय घसरण?

अमेरिकी फार्मा कंपनी फायजर आणि त्यांची जर्मनीची पार्टनर कंपनी BioNTech SE ने कोरोना व्हायरस वॅक्सिनच्या तीसऱ्या टप्प्यातील ट्रायल 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. या दोन्ही कोरोना काळातील अशा कंपन्या आहेत, ज्यांनी वॅक्सिनच्या यशस्वी परिणामांचा आकडा सादर केला आहे. OANDA चे सीनियर मार्केट एनालिस्ट एडवर्ड यांनी सांगितलं की, कोरोना वॅक्सिनची बातमी अतिशय मोठी आहे. याचा जगभरातील मार्केटवर परिणाम पाहायला मिळतो आहे. अशात आता सेफ-सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची केली जाणारी खरेदी थांबू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी घसरण पाहायला मिळू शकते.

Published by: Karishma Bhurke
First published: November 10, 2020, 5:49 PM IST

ताज्या बातम्या