जाहिरात
मराठी बातम्या / मनी / HDFC आणि kotak च्या ग्राहकांनो लक्ष द्या! जूनमध्ये या दिवसांत बंद राहणार सर्व्हिस

HDFC आणि kotak च्या ग्राहकांनो लक्ष द्या! जूनमध्ये या दिवसांत बंद राहणार सर्व्हिस

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक

HDFC Bank Services: तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात बँकेच्या काही सेवा दोन दिवस बंद राहतील. बँकेकडून ग्राहकांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

HDFC Bank Services: एचडीएफसी बँकेच्या वतीने, त्यांच्या ग्राहकांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलाय. त्यामध्ये सांगण्यात आलंय की, सिस्टमची देखभाल आणि अपग्रेडमुळे जून महिन्यात काही सेवा दोन दिवस बंद राहतील. या सेवा कधी बंद होतील याचीही माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. बँकेने सांगितलं की, सिस्टमच्या देखभाल आणि अपग्रेडेशनसाठी नियोजित डाउनटाइममुळे काही सेवा बंद राहतील.

News18लोकमत
News18लोकमत

यासोबतच कोटक महिंद्रा बँकेच्या काही निवडक डेबिट कार्ड सेवा देखील जूनमध्ये काही तासांसाठी उपलब्ध राहणार नाही. तुम्हाला सर्वोत्तम बँकिंग अनुभव देण्यासाठी हे केले जात असल्याचे बँकेने लिहिले आहे. बँकेच्या कोणत्या सेवा कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घेऊया.

या तिन्ही सेवा 10 आणि 18 जून रोजी उपलब्ध होणार नाहीत

एचडीएफसी बँकेकडून आगामी 10 आणि 18 जूनला अकाउंट बॅलेन्स, डिपॉझिट आणि फंड ट्रान्सफर संबंधित सेवा बाधित राहतील. या दिवशी पहाटे 3 ते सकाळी 6 या वेळेत या तिन्ही सेवा खंडित राहतील. बँकेने सिस्टम अपग्रेड करण्यासाठी 4 जून रोजी सकाळी 3 ते 6 दरम्यान बँकिंग सेवा बंद ठेवण्यात आली होती. यावेळी बँकिंग सेवा साधारणपणे कमी वापरल्या जातात.

Investment Tips: ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचं प्लानिंग करताय? होतात हे 5 नुकसान

 कोटक महिंद्रा बँकेच्या या सेवाही राहतील बंद

दुसरीकडे, कोटक महिंद्रा बँकेच्या निवडक डेबिट कार्ड सेवा देखील 10 जून रोजी काही तासांसाठी बंद असतील. कोटक बँकेचे डेबिट कार्ड, स्पेंज कार्ड आणि गिफ्ट कार्ड ग्राहक 10 जून रोजी काही तासांसाठी या सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. यामध्ये कार्ड कंट्रोल, कार्ड ब्लॉकिंग आणि अनब्लॉकिंग, खाते लिंकिंग आणि डिलिंकिंग, नवीन डेबिट कार्ड किंवा इमेज कार्डसाठी रिक्वेट, कार्ड बंद करण्याची रिक्वेट, टोकनायझेशनसाठी रजिस्ट्रेशन आणि पिन री-जनरेशन या सेवांचा समावेश आहे.

Bank Account: सेव्हिंग अकाउंटवर रोज मिळतं व्याज, कसा कॅलक्युलेट केला जातो इंट्रेस्ट?

एचडीएफसी ग्राहक व्हॉट्सअॅपद्वारे चेक करु शकता बॅलेन्स

HDFC बँकेचे ग्राहक रजिस्ट्रेशन करून आणि सोप्या स्टेप्स फॉलो करून व्हॉट्सअॅपद्वारे बॅलेन्स आणि इतर सेवा मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेतील रजिस्टर्ड नंबरवरून बँकेच्या व्हॉट्सअॅप क्रमांक 7070022222 वर Hi पाठवावा लागेल. यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करा. यामध्ये तुम्हाला अकाउंट सर्व्हिसेसचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला बॅलन्स इन्क्वायरी, अकाउंट स्टेटमेंट आणि शेवटच्या सात ट्रांझेक्शनचा पर्याय मिळेल. यापैकी, तुम्हाला बॅलन्स इन्क्वायरी वर क्लिक करून तुमचं बॅलेन्स जाणून घेता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात