advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank Account: सेव्हिंग अकाउंटवर रोज मिळतं व्याज, कसा कॅलक्युलेट केला जातो इंट्रेस्ट?

Bank Account: सेव्हिंग अकाउंटवर रोज मिळतं व्याज, कसा कॅलक्युलेट केला जातो इंट्रेस्ट?

बँकेतील बचत खात्यावर किती व्याज मिळते आणि ते कसे मोजले जाते याची माहिती बहुतांश ग्राहकांना नसते. दरवर्षी 3 टक्के व्याज मिळत असल्याची माहिती असली तरी खात्यात पैसे कमी-जास्त होत राहिल्याने त्याची मोजदाद कशी होते. हे आपण पाहूया...

01
 बँकेत सेव्हिंग अकाउंट असणं कॉमन गोष्ट असते. कारण व्यक्ती पैशाच्या सुरक्षिततेसाठी सेव्हिंग अकाउंटमध्ये ते जमा करत असते. मध्ये किंवा इतर बचत योजनांसारखे कोणतेही बंधन किंवा परिपक्वता कालावधी नसतो. त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही खात्यातून पैसे जमा आणि काढू शकता. बचत खात्यावर बँक साधारण व्याज देते.

बँकेत सेव्हिंग अकाउंट असणं कॉमन गोष्ट असते. कारण व्यक्ती पैशाच्या सुरक्षिततेसाठी सेव्हिंग अकाउंटमध्ये ते जमा करत असते. सेव्हिंग अकाउंटमध्ये एफडी किंवा इतर बचत योजनांसारखे कोणतेही बंधन किंवा परिपक्वता कालावधी नसतो. त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही खात्यातून पैसे जमा आणि काढू शकता. बचत खात्यावर बँक साधारण व्याज देते.

advertisement
02
बँकेत उघडलेल्या बचत खात्यावर साधारणपणे 3 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. मात्र, काही प्रायव्हेट आणि स्मॉल फायनेंस बँका सेव्हिंग अकाउंटवर 7% पर्यंत व्याज देतात. खरंतर हे जमा रकमेच्या मर्यादेवर अवलंबून असते.

03
एफडी किंवा इतर बचत योजनांमध्ये एकरकमी आणि नियमितपणे पैसे जमा केले जातो. यामुळे ग्राहकांना या योजनांवर मिळणारे व्याज माहित असते, परंतु जर बचत खात्यातून दररोज पैसे व्यवहार केले जातात, तर त्यावर व्याज कसे जोडले जाते.

04
बहुतेक ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात ठेवलेल्या पैशावर व्याज कसे मोजले जाते हे माहित नसते. आरबीआयच्या नियमांनुसार, बँका बचत खात्यावर दररोज व्याज कॅलक्युलेट करतात. काही बँका त्रैमासिक आणि काही अर्धवार्षिक गणना करतात. प्रत्येक वेळी चक्रवाढ व्याज पासबुकमध्ये दिसू लागते.

05
बहुतेक बँकांच्या वेबसाइटवर सेव्हिंग अकाउंट कॅल्क्युलेटर उपलब्ध असतो. जिथे तुम्ही आवश्यक माहिती भरुन व्याज मोजू शकता. यामध्ये केवळ तुम्हाला निश्चित रकमेवर वर्षभरात किती व्याज मिळेल हे कळेल. बचत खात्यात पैसे कमी जास्त येत राहतात. अशावेळी व्याज कसे मोजले जाईल?

06
समजा तुमचे बँकेत बचत खाते आहे आणि त्यात 2 लाख रुपये जमा आहेत. बँक बचत खात्यावर 4% वार्षिक व्याज देत आहे, त्यामुळे वार्षिक व्याज 8,000 रुपये मिळते. जर तुम्ही 365 दिवसांच्या व्याजाची ही रक्कम मोजली तर रोजचे व्याज 21.91 रुपये होईल.

07
अशा प्रकारे मासिक व्याज रु.666 होते. तुम्ही 2 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये काढल्यास, उर्वरित 1 लाख रुपयांवर दररोज व्याज मोजले जाईल. त्यानंतर, बचत खात्यात मासिक किंवा त्रैमासिक आधारावर व्याज जमा केले जाते.

08
सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळे आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI 2.7 टक्के व्याज देत आहे, तर खाजगी क्षेत्रातील दिग्गज HDFC बँक बचत खात्यावर 3.5 टक्के व्याज देत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  बँकेत सेव्हिंग अकाउंट असणं कॉमन गोष्ट असते. कारण व्यक्ती पैशाच्या सुरक्षिततेसाठी सेव्हिंग अकाउंटमध्ये ते जमा करत असते. <a href="https://lokmat.news18.com/tag/saving/">सेव्हिंग अकाउंट</a>मध्ये <a href="https://lokmat.news18.com/tag/fixed/">एफडी </a>किंवा इतर बचत योजनांसारखे कोणतेही बंधन किंवा परिपक्वता कालावधी नसतो. त्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही खात्यातून पैसे जमा आणि काढू शकता. बचत खात्यावर बँक साधारण व्याज देते.

    MORE
    GALLERIES