मुंबई, 13 जून : HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी (HDFC Bank Customers) अलर्ट जारी केला आहे. आजकाल पॅन कार्ड अपडेटबाबत (PAN Card Updates) अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना समोर आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर बँकेने ग्राहकाना काही सूचना दिल्या आहेत. बँकेने एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये पॅन कार्ड डिटेल्स अपडेट करण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यास मनाई करण्यात आली आहे. आजकाल पॅन कार्ड नंबर अपडेट करण्याच्या नावावर अनेक बनावट एसएमएस येत आहेत. एसएमएस कुठून आला तपासा एचडीएफसी बँकेने सांगितले की, त्यांच्या ग्राहकांनी नेहमी लक्षात ठेवावे की बँक एसएमएस किंवा कॉलद्वारे गोपनीय माहिती शेअर करण्यास कधीही विचारणार नाही. मात्र, केवळ एचडीएफसी बँकच नाही तर कोणतीही बँक आणि वित्तीय संस्था कधीही त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिक खात्याचे तपशील शेअर करण्यास सांगत नाही. LIC शेअर होल्डर्ससाठी आजचा दिवस महत्त्वाचा; गुंतवणूकदारांचं नुकसान आणखी वाढणार की कमी होणार?
#GoDigitalGoSecure and never click on unknown links asking you to update your PAN card details.
— HDFC Bank (@HDFC_Bank) June 10, 2022
Visit: https://t.co/UJ16AYZqG4#BankSafe #StaySafe #SecureBanking pic.twitter.com/eXn0LOoePN
बँकांनी असे केल्यास, ते बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर उपस्थित असलेल्या अधिकृत क्रमांकाद्वारे एसएमएस पाठवून तसे करतात. ग्राहकांनी हे क्रमांक नेहमी लक्षात ठेवावे. एचडीएफसी बँकेच्या बाबतीत, ग्राहकांना अधिकृत क्रमांक 186161 किंवा HDFCBK/HDFCBN या आयडीवरून एसएमएस येईल. तसेच SMS मध्ये उपस्थित असलेल्या लिंक नेहमी अधिकृत डोमेन hdfcbk.io वरून येतील. रेपो दरवाढीनंतर बँकांकडून बचत खाते आणि FD वरील व्याजदरात वाढ, ग्राहकांचा फायदा नवीन नंबरवरून कॉल आले तरीही सतर्क राहा. तुम्हाला असे खोटे एसएमएस किंवा कॉल आल्यास, त्याची तात्काळ बँकेला तक्रार करा किंवा सायबर फसवणुकीबाबत तुमच्या तक्रारीसाठी तुम्ही नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलला भेट देऊ शकता. आर्थिक व्यवहाराच्या वेळी अतिरिक्त पावले उचलली जाऊ शकतात.