• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • ऐन लग्नसराईतच वाढणार रेडिमेड कपड्यांचे दर, 5 टक्क्यांवरुन वाढून 12% होणार GST दर

ऐन लग्नसराईतच वाढणार रेडिमेड कपड्यांचे दर, 5 टक्क्यांवरुन वाढून 12% होणार GST दर

जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल आणि चपलांची खरेदी महागणार आहे. सरकारने तयार कपडे, कापड आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत, जे जानेवारी 2022 पासून लागू होतील.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: साधारण नोव्हेंबर महिन्यापासून लग्नसराईचा काळ सुरू होतो. मार्च-एप्रिलपर्यंत हा सीझन असतो. या काळात कपड्यांची शॉपिंग करण्याचा विचार असेल तर तुम्हाला आता रेडिमेड कपडे महाग पडू शकतात. जानेवारी 2022 पासून रेडिमेड कपडे, टेक्सटाइल आणि चपलांची खरेदी महागणार आहे. सरकारने तयार कपडे, कापड आणि फुटवेअर यांसारख्या तयार उत्पादनांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत, जे जानेवारी 2022 पासून लागू होतील. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ अर्थात CBIC ने 18 नोव्हेंबर रोजी एक अधिसूचना जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. जानेवारी 2022 पासून कापडावरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरुन वाढून 12 टक्के असेल. त्याचप्रमाणे कोणत्याही किमतीच्या बनवलेल्या कपड्यांवरील जीएसटीचा दरही 12 टक्के असेल. यापूर्वी 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 5 टक्के जीएसटी लागू होता. त्याचप्रमाणे, इतर कापडांवर (विणलेले कापड, सिंथेटिक, पाइल फॅब्रिक्स, ब्लँकेट, तंबू, टेबल क्लॉथ इतर कापडं इ.) देखील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. यासोबतच कोणत्याही किमतीच्या फुटवेअरवर लागू होणारा जीएसटी दरही 12 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी 1000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या फुटवेअरवर 5 टक्के दराने जीएसटी आकारला जात होता. हे वाचा-NPS vs APY: नॅशनल पेन्शन योजना की अटल पेन्शन योजना? कोणती योजना आहे फायदेशीर? यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्गाला तोटा सहन करावा लागू शकतो. याशिवाय क्लोदिंग मॅन्युफ्रॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडियाने (CMAI) ने देखील या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या उत्पादनांवर जीएसटी दर वाढवण्याचा सरकारचा निर्णय निराशजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मिंटमधील वृत्तानुसार, CMAIचे प्रेसिडेंट राजेश मसंद यांनी असे म्हटले आहे की CMAI तसेच इतर असोसिएशन्स शिवाय कामगार संघटना सरकार आणि जीएसटी काउन्सिलला असं अपील करतायंत की जीएसटी दरातील हा बदल लागू केला जाऊ नये. हे वस्त्रोद्योग आणि अॅपेरल व्यवसायासाठी हे खूपच निराशाजनक आहे. हे वाचा-Cryptocurrency संदर्भात मोठी अपडेट, वाचा काय होणार भारतीय गुंतवणुकदारांवर परिणाम या निवेदनात पुढे म्हटले आहे की, उद्योगांना आधीच कच्च्या मालाच्या वाढत्या दबावाचा सामना करावा लागत आहे. यासोबतच पॅकेजिंग मटेरियल आणि मालवाहतुकीतही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत जीएसटी दरात वाढ हा आणखी एक मोठा धक्का आहे. ते पुढे म्हणाले की, जीएसटी दरात कोणतीही वाढ केली नसतानाही बाजाराला कपड्यांमध्ये 15-20 टक्के वाढ अपेक्षित आहे. जीएसटीच्या दरात वाढ केल्यानंतर आणखी वाढ होऊ शकते आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कारण 80 टक्क्यांहून अधिक कपड्यांचा बाजार हा अशा कपड्यांचा आहे ज्यांची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: