जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / एस्कॉर्टच्या नावाखाली 100 जणांना लुटलं; अल्पवयीन मुलाला लाखाचा गंडा, टोळीचा पर्दाफाश

एस्कॉर्टच्या नावाखाली 100 जणांना लुटलं; अल्पवयीन मुलाला लाखाचा गंडा, टोळीचा पर्दाफाश

सर्व आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून यादरम्यान त्यांची अधिक चौकशी केली जाणार आहे.

सर्व आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून यादरम्यान त्यांची अधिक चौकशी केली जाणार आहे.

सायबर क्राइम पोलिसांच्या नावाने एस्कॉर्ट सेवा (सुरक्षितता) देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलाला तब्बल 1 लाख 18 हजार रुपयांचा गंडा घातला गेला.

  • -MIN READ Local18 Panchkula,Haryana
  • Last Updated :

तारा ठाकूर, प्रतिनिधी पंचकुला, 15 जून : ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं दिवसागणिक वाढतच आहेत. दररोज अनेक लोक या फसवणुकीला बळी पडतात. असाच एक प्रकार हरियाणाच्या पंचकुलामधून समोर आला आहे. सायबर क्राइम पोलिसांच्या नावाने एस्कॉर्ट सेवा (सुरक्षितता) देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलाला तब्बल 1 लाख 18 हजार रुपयांचा गंडा घातला गेला. पोलिस उपायुक्त निकिता खट्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकुलातील एका अल्पवयीन मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्याला एस्कॉर्ट सेवा देण्याच्या बहाण्याने त्याच्या खात्यातून 1 लाख 18 हजार रुपये काढले गेले. त्यानंतर पंचकुला सायबर क्राइम पथकाने या प्रकरणाचा तपास करून या टोळीचा पर्दाफाश झाला. सर्व आरोपींना 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं असून यादरम्यान त्यांची अधिक चौकशी केली जाणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ही टोळी राजस्थानमधून कार्यरत होती. या भामट्यांनी सुमारे 100 लोकांना लुटलं. एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली फसवणूक करण्याचे काम गेल्या एका वर्षापासून सुरू होतं. त्यांचे सदस्य वेबसाईटच्या माध्यमातून आपलं नाव आणि नंबर जाहीर करायचे, ज्यावर लोक एस्कॉर्ट सेवेसाठी संपर्क करायचे. त्यानंतर या टोळीतील लोक एस्कॉर्ट सेवा आणि हॉटेल बुकिंगच्या नावाखाली पैसे उकळायचे. Summer Tips : उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर रामबाण उपाय आहे हे पीठ! शरीराला मिळेल थंडावा सर्व आरोपी राजस्थानातील डुंगरपूर येथील रहिवासी आहेत. उदयपूरमध्ये ते भाड्याचं घर घेऊन टोळी चालवायचे आणि लोकांची ऑनलाईन फसवणूक करायचे. आरोपींकडून 24 फोन आणि 5 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींवर यापूर्वी कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात