नवी दिल्ली, 1 जानेवारी : सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी 2020 चा पहिला दिवस खूशखबर घेऊन आला. रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 131 रुपयांनी घटला. चांदीच्या भावातही 590 रुपयांची घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत 39 रुपये 818 रुपये प्रतितोळा झाले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घसरण झालीय. चांदीचा दर 47,655 रुपये प्रतिकिलो झालाय. सोन्याची खरेदी करताना सराफावर अंधपणे विश्वास ठेवून चालत नाही. सोन्याची मूळ किंमत, घडणावळीचे दर अशा घटकांचा सोन्याच्या किंमतींवर परिणाम होतो. सोन्याच्या किंमती ठरवण्यासाठी पूर्ण देशात एकच निकष नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. पक्कं बिल घ्या सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत. शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा. (हेही वाचा : आर्थिक मंदीतही मोठा दिलासा, या गाड्यांच्या विक्रीत झाली मोठी वाढ) हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. किंमतीबद्दल राहा सावधान सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी. ==========================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.