Home /News /crime /

घरच्यांकडून होता लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने रेल्वेखाली दिला जीव

घरच्यांकडून होता लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने रेल्वेखाली दिला जीव

दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. मात्र घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यामुळे त्यांनी जीव देण्याचा निर्णय घेतला

    लखनऊ, 31 डिसेंबर: घरच्यांनी लग्नाला परवानगी (No permission to marriage) दिली नाही, म्हणून एका प्रेमी युगुलानं (Couple) रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या (Suicide on railway track) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं आणि लग्न करण्याची इच्छा होती. मात्र घरच्यांनी या लग्नाला विरोध केल्यामुळे दोघंही अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. लग्नाला मिळाला नकार उत्तर प्रदेशातील औरेया भाागात राहणाऱ्या एका तरुणाचं त्याच भागातील तरुणीवर प्रेम जडलं होतं. दोघंही एकमेकांना आवडत होते आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ त्यांनी घेतली. आपलं एकमेकांसोबत लग्न झालं नाही, तर इतर कुणाशीही लग्न करायचं नाही, असंही त्यांनी ठरवलं होतं. लवकरच आपण घरच्यांकडे लग्नाचा प्रस्ताव मांडू आणि सर्वसहमतीने लग्न करू, असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. घरच्यांनी दिला नकार घरच्यांकडे जेव्हा या दोघांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा घरच्यांनी लग्नाला परवानगी देण्यास साफ नकार केला. हे लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ शकणार नाही, असं दोघांच्याही घरच्यांनी ठामपणे सांगितलं आणि एकमेकांना यापुढे भेटण्यासही मनाई केली. त्यानंतही हे दोघं चोरून एकमेकांना भेटत राहिले आणि एकमेकांशी लग्न करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करत राहिले. काही वेळा घरातून पळून जाऊन लग्न करण्याचाही विचार त्यांनी केला. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे चरितार्थ कसा चालणार, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. आत्महत्येचा निर्णय अखेर आपलं एकमेकांशी लग्न होण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने त्यांनी एकत्र मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही एकाच वेळी रेल्वेखाली जीव द्यायचा निर्णय़ घेतला. हा निर्णय पक्का झाल्यावर दोघंही रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडले. एकमेकांना ठरलेल्या जागी भेटले आणि रेल्वे स्टेशनकडे गेले. त्यांनी ती रात्र एकत्र घालवली आणि पहाटेच्या सुमाराला रेल्वे ट्रॅकवर आपला जीव दिला. हे वाचा- डॉक्टर होण्याचं स्वप्न अधूरं सोडून श्रुतीचं टोकाचं पाऊल, नाशिक हळहळलं पोलीस तपास सुरू या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले असून दोघांच्याही कुटुंबीयांकडे ते चौकशी करत आहेत. युगुलाच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Marriage, Police, Railway track, Railway track accident

    पुढील बातम्या