मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gram Ujala Scheme: 3 वर्षांच्या वॉरंटीसह, केवळ 10 रुपयांत मिळेल LED बल्ब; जाणून घ्या या योजनेबाबत

Gram Ujala Scheme: 3 वर्षांच्या वॉरंटीसह, केवळ 10 रुपयांत मिळेल LED बल्ब; जाणून घ्या या योजनेबाबत

ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आलं आहे. या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे.

ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आलं आहे. या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे.

ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आलं आहे. या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे.

नवी दिल्ली, 20 मार्च : उर्जा मंत्री राज कुमार सिंह (RK Singh) यांनी शुक्रवारी ग्राम उजाला योजना (Gram UJALA Scheme) लाँच केली. या योजनेअंतर्गत केवळ 10 रुपयांत एलईडी बल्ब मिळणार आहेत. सरकारचा ग्रामीण भारतातील अंधार दूर करणं हा या योजनेचा उद्देश आहे.

ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आलं आहे. या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे. ही सरकारी कंपनी जगातील सर्वात कमी दरातील एलईडी बल्ब विकत आहे. ही EESL (Energy Efficiency Services Ltd) ची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. EESL भारत सरकारची एनर्जी कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठी एनर्जी सर्विस कंपनी आहे. याची 100 टक्के भागीदारी भारत सरकारकडे आहे.

तीन वर्षांची वॉरंटी -

ग्राम उजाला प्रोग्रामअंतर्गत पहिल्या टप्प्यात 7 आणि 12 वॅटचे LED bulbs उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बिहारच्या आग्रा, उत्तर प्रदेशातील वाराणसी, आंध्र प्रदेशातील विजयवाडा, महाराष्ट्रातील नागपूर आणि पश्चिम गुजरातमधील काही जिल्ह्यात बल्ब उपलब्ध होणार आहेत. या बल्बची वॉरंटी तीन वर्षांची असेल आणि हे बल्ब केवळ ग्रामीण भारतात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

(वाचा - अटल पेन्शन योजना: 5000 रुपयांपर्यंत पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचं?)

भारतात अद्यापही 300 मिलियन जवळपास 30 कोटीहून अधिक पिवळे बल्ब आहेत. या बल्बला एलईडी बल्बशी रिप्लेस केल्यास, दरवर्षी 40,743 मिलियन किलोवॅट उर्जेची बचत होईल. त्याशिवाय कार्बन डायऑक्साईडमध्येही वर्षाला 37 मिलियन टनची कमी येईल.

First published:
top videos

    Tags: Gram, Gram ujala scheme, Money, Red light, Scheme